गांधी विद्यालयात पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : स्थानिक नगरपरिषद गांधी विद्यालय शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व नवीन प्रवेश केलेल्या तसेच वर्ग सहावी ते दहावीतील विद्यार्थ्यांना सुद्धा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले दिनांक 30 जून सकाळी 11 वाजता महाविद्यालयाच्या ड्रॉइंग हॉल येथे कार्यक्रमाची सुरुवात झाली यामध्ये नवीन प्रवेश केलेल्या वर्ग पाचवीतील सर्व विद्यार्थ्यांना गांधी विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री अमित कडवे यांच्याकडून सुंदर अशी स्कूल बॅग प्रत्येक विद्यार्थ्याला सहा नोटबुक असलेला एक संच शाळेकडून त्याला कंपास आणि इतर साहित्य तसेच शासनाकडून आलेले पाठ्यपुस्तके भेट देण्यात आली विद्यार्थ्यांचा स्वागत गुलाब पुष्प तसेच चॉकलेट देऊन करण्यात आले तसेच वर्ग सहावीचे दहावीतील विद्यार्थ्यांना सुद्धा नोट बुकांचाकांचा सेट भेट म्हणून देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती उषाताई नागपुरे तसेच प्रमुख उपस्थित म्हणून शालेय व्यवस्थापन समितीच्या सौ.ज्योत्स्ना तीवस्कर मॅडम होत्या तसेच शुभांगी रिधोरकर मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विश्वेश्वर पाहिले सरांनी केले. नगरपरिषदच्या एक ते चौथीतील आर्मी परिसरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नोटबुक ची व्यवस्था करण्यात आली पालकांना पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसोबत त्यांचे स्वागत करण्यात आले पहिल्या दिवसाचा उत्साह विद्यार्थ्यांचा पाहण्यासारखा होता उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्यांच्या नंतर पहिल्या दिवशी सर्व साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांचे आनंदात दिसत होते. या कार्यक्रमांचे संचालन श्री प्रमोद नागरे तर दत्तात्रय खंदारे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी करतात श्री बाबाराव चौकोनी श्री विजय जवादे श्रीमती माला खुणे श्रीमती स्मिता बिजवे श्रीमती काळे यांनी सहकार्य केले