सामाजिक

दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्या ; सहा प्रवाश्यांचा मृत्यू 

Spread the love

मलकापूर / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

            मलकापूर शहरातील महामार्ग क्र.6 वर दोन ट्रॅव्हल्स च्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोन 6 प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे.तर अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  घटना आज पहाटे ( 29 जुलै) तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डान पुलावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार एम एच 08. 9458 ही अमरनाथची तिर्थयात्रा करुन ही ट्रॅव्हल्स हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 तिर्थयात्री होते. तर एम.एच 27 बी.एक्स. 4466 या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूरवरुन नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावरती समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने अक्षरशा चिरडल्या गेल्या. या भीषण अपघातत सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही ट्रॅव्हल्समधील ते 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी, दसरखेड एम.आय.डी.सी चे पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तातडीनं मदत कार्य सुरू केले आहे.

जखमींची प्रकृती चिंताजनक

दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्यांना ॲम्बुलन्स वेळेवर उपलब्ध झाली नाही. त्यामुळं पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी यांनी जखमींना पोलिसांच्याच वाहनाने मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करत माणुसकीचे दर्शन घडवले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी, ग्रामीण पो.नी. एफ.सी. मिर्झा यांनी भेट दिली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close