क्राइम

ती मावशीला भेटायला आली आणि काकाने केले कांड 

Spread the love

मुंबई / नवप्रहार डेस्क

      मावशी कडे आलेल्या एका २० वर्षीय तरुणीवर तिच्याच काकाने आत्यचार केल्याची घटना मुंबईच्या उपनगर मध्ये घडली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारी नंतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय तरुणी मुंबईतील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. पीडितेची मावशी आणि आरोपी काका मुंबईतच राहतो. १५ जून रोजी ड्यूटी संपल्यानंतर पीडित तरुण मावशीला भेटायला तिच्या घरी गेली. यावेळी आरोपी काका देखील घरातच होता.

दरम्यान, पीडितेची मावशी काही कामानिमित्त बाहेर गेली. तेव्हा आरोपी काकाने पीडितेसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीला पीडित तरुणीने विरोध केला असता आरोपीने किचनमधून चाकू आणला. चाकूचा धाक दाखवून त्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार  केला.

 

 

अत्याचारानंतर आरोपीने पीडित तरुणीचे व्हिडीओ देखील काढले. याबाबत कुणालाही सांगितल्यास समाजमाध्यमांवर व्हिडीओ टाकून तुझी बदनामी करेल, अशी धमकी देखील आरोपीने तरुणीला दिली. या संपूर्ण प्रकारानंतर पीडिता मानसिक तणावात गेली. सुरुवातीला याबाबत कुणालाही सांगितले नाही.

मात्र, आरोपी काकाकडून पुन्हा शरीरसंबंधांची मागणी होत असल्याने पीडितेने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं कळताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली तिने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पीडित तरुणीची राजावाडी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close