क्राइम

एमपीएएस्सी पास बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडला कुजलेल्या अवस्थेत 

Spread the love

खून झाल्याचा पोलिसांना संशय 

 पुणे  / नवप्रहार न्यूज नेटवर्क 

                      १५ जून रोजी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह वेल्हा तालुक्यातील  किल्ले राजगड च्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली आहे. मुख्य म्हणजे या तरुणी सोबत असलेल्या तरुणी बेपत्ता आहेत. पोलिसांनी घातपाताची शक्यता वर्तविली आहे. 

दर्शना दत्तू पवार असे मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती नुकतीच एमपीएससीची परीक्षा पास उत्तीर्ण झाली होती. ती हरवल्याची तक्रार १५ जून रोजी नऱ्हे आणि सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. मात्र आज सकाळी राजगडच्या पायथ्याशी हा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मुलीचे वडील दत्ता दिनकर पवार यांनी फिर्याद दिली आहे.

दर्शना ९ जून रोजी पुण्यातील सत्काराच्या कार्यक्रमासाठी स्पॉट लाईट ॲकॅडमी येथे आली होती. ११ जून सायंकाळी चार वाजेपर्यंत घरच्या मंडळीच्या संपर्कात होती. मात्र १२ रोजी दर्शनाला आम्ही दिवसभर फोन करत होतो. मात्र तिने फोन उचलले नाहीत. यामुळे कुटुंबियांनी स्पॉट लाईट ॲकॅडमी येथे येऊन तिची चौकशी केली. त्यावेळी सांगण्यात आले की, दर्शना ही त्याचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे हिच्यासोबत सिंहगड आणि राजगड याठिकाणी फिरण्यासाठी गेली आहे. मात्र हे दोघेही संपर्कात नाहीत आणि माघारी देखील आलेले नाहीत. म्हणून त्यांनी सिंहगड रोड पोलिसात मिसिंगची तक्रार दिली.

वेल्हे तालुक्यात असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सतीचा माळ या परिसरात हा मृतदेह सापडला आहे. साधारण आठ दिवसांपूर्वी हा खून झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. सापडलेला मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून मृतदेहाच्या जवळ काही वस्तू सापडल्या असून त्यावरून तरुणीची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे.

संबधित तरुणी ही पुण्यात एमपीएससी करत होती. ती परीक्षा ती पासही झाली होती. मात्र आठ दिवसानंतर अचानक मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वेल्हे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजच्या घटनेने नेमका खून कुठल्या कारणाने झाला याचा तपास करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. लवकरच या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close