दावलामेटी ग्रामपंचायत ने उडविला स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा
गावातला कचरा गावातच , ही कसली स्वच्छता!
वाडी ( प्र )
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचा स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासण्याचे काम दवलामेटी ग्रामपंचायत कडून होत असल्याची लेखी तक्रार जिल्हा ‘अधिकारी साहेबाना दवलामेटी तील काही नागरिकांनी केली आहे.
दवलामेटी ग्रामपंचायत अंतर्गत आकांक्षा ले आऊट लगतं ग्रामपंचायत कडून गावातील घाण, कचरा गोळा करून टाकण्यात येतो. काही अंतरावर साईनाथ कॉन्व्हेंट व कॉलेज असल्या मुळे याच मार्गाने शाळकरी मुले मोठ्या प्रमाणात जाणे येणे करतात.कधी कधी कचरा जाळून टाकतात तरी वाऱ्याने हा घाण कचरा परिसरात पसरतो गावातील ग्रामपंचायत इथे घाण आणून टाकल्या मुळे ईतर व्यवसाईक जसेकी बिछायात व्यापारी पण त्याचा खेर कचरा इथेच टाकतो बुधवार ला तर एक गाय व चार कुत्रे मेलेल्या अवस्थेत कुणी तरी आणून टाकले दुर्गंधी पसरल्याने रोगराईचा धोका निर्माण झाला असून ग्रामपंचायत नागरिकांचा जीवशी खेळत आहे. एक वर्षा आधी डम्पिंग यार्ड चे बांध काम पूर्ण झाले असूनहि,तरीही कचरा असा रहिवाशी परिसरात टाकने म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा स्वच्छ भारत अभियानाला काळिमा फासनाचा प्रकार आहे असे आकांक्षा ले आऊट परिसरातील नागरिक तुषार सरागे, रामेश्वर केवटे, विजय बालपांडे, भास्कर तरारे यांनी माहिती दिली व संबंधित विषयाला धरून जिल्हा अधिकारी नागपूर यांना तक्रार दाखल केली.