क्राइम

ऑनलाईन चालणाऱ्या सेक्स रॅकेट चा पर्दाफाश ; 2 दलालांना अटक 

Spread the love

 मुंबई / नवप्रहार मीडिया नेटवर्क     

    ऑनलाईन च्या  या जगात आता सगळं काही ऑनलाईन सुरू आहे. सामानाच्या खरेदी पासून ते मुली शोधण्याचे इतकंच काय तर लग्न सुद्धा आता ऑनलाईन होत आहेत. याचा फायदा काही असामाजिक तत्वा द्वारे देखील उठवला जात आहे. दोन लोकांनी ऑनलाईन (व्हाट्सअप ) च्या माध्यमातून सेक्स रॅकेट चा धंदा सुरू केला होता. पोलिसांनी सापळा रचत या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. दोन आरोपींना अटक करून 3 महिलांची सुटका केली आहे.  निलेश पाटील आणि नरेंद्र देवरेला पोलिसांनी अटक अशी आरोपींची नावे आहेत. त्या दोघांना पुढील कारवाईसाठी कस्तुरबा मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

काही लोक व्हॉट्सऍपवरून ग्राहकांना मुलीचे फोटो पाठवून सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती युनिट 12 चे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास भोसले याना मिळाली. त्या माहितीनंतर पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, रासकर, महिला उपनिरीक्षक शेख आदींच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी यांच्याशी संपर्क साधत मुली पुरवण्याची मागणी केली. तेव्हा निलेश पाटील याने मोबाईल वर महिला आणि तरुणींचे फोटो पाठवले.

पोलिसांनी गुरुवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसराजवळ सापळा रचला. तेव्हा नरेंद्र हा तीन मुलींना गाडीतून घेऊन तेथे आला. पोलिसांनी कारवाई करून तीन मुलींची सुटका केली. तसेच नरेंद्रला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत निलेश पाटीलचे नाव समोर आले. त्यालादेखील पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.

निलेश हा मुख्य सूत्रधार असून तो गेल्या दीड वर्षापासून हे सेक्स रॅकेट चालवत होता. तो पीडित महिलांना इव्हेंट आणि डान्स क्लासच्या नावाखाली सेक्स रॅकेटमध्ये ओढत असायचा. निलेश हा ग्राहकांना महिलांचे फोटो व्हॉट्सऍपवर पाठवायचा. काही रक्कम तो महिलांना देत असायचा, तर नरेंद्र हा महिलांना ग्राहकांनी सांगितलेल्या ठिकाणी गाडीने सोडत असायचा. त्याला काही मोबदला मिळायचा. पोलिसांनी निलेशचा मोबाईल जप्त केला आहे. त्या मोबाईलमध्ये 35 महिलांचे नंबर आणि फोटो आढळून आले आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close