क्राइम

12 वर्षाच्या मुलीकडून देहव्यावसाय करवून घेणाऱ्या महिला आणि हॉटेल व्यवस्थापकाला अटक

Spread the love

मुंबई / नवप्रहार मीडिया

              12 वर्षाच्या मुलीकडून देहव्यावसाय करवून घेणाऱ्या महिला आणि हॉटेल व्यवस्थापकाला काखा 10 च्या चमू कडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीला महिला आणि हॉटेल व्यवस्थापकाच्या तावडीतून सोडवून त्यांना अगक केली आहे. ही कारवाई अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली आहे.

एक महिला अंधेरी पूर्व येथील एका हॉटेल मॅनेजरच्या मदतीने 12 वर्षाच्या मुलीकडून बळजबरीने देहविक्री करून घेत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष 10 चे प्रपोनि. दीपक सावंत यांना मिळाली होती. कक्ष या10च्या पथकाने आपल्या खबऱ्यामार्फत अधिक माहिती मिळवली असता अंधेरी पूर्व मरोळ येथील ‘सिल्वर क्लाउड’ हॉटेलचा व्यवस्थापक या देहविक्रीत गुंतला असून हॉटेलवर येणाऱ्या ग्राहकांना तो मुली पुरवत असल्याची माहिती समोर आली.

कक्ष 10 च्या पथकाने बोगस ग्राहक तयार करून हॉटेल सिल्वर क्लाउड या ठिकाणी पाठवून हॉटेल व्यवस्थापकाकडे मुलीची मागणी केली. सौदा ठरताच कक्ष 10च्या पथकाने हॉटेल परिसरात सापळा रचून ‘सिल्वर क्लावुड हॉटेल या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी 12  वर्षे वयोगटातील एक मुलगी आणि एक महिला मिळून आली. गुन्हे शाखने महिलेला ताब्यात घेऊन तिच्याजवळून 7 हजार रुपये रोख आणि 2 मोबाईल जप्त करून मुलीची या महिलेच्या तावडीतून सुटका करण्यात आली.

गुन्हे शाखेने या देहविक्रीच्या व्यापाऱ्यात गुंतलेल्या सिल्वर क्लाउड हॉटेलच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. या दोघा विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close