पान पिपरी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत विभागीय समितीने घेतली आढावा बैठक
माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू ह्यांनी घेतली पान पिपरी उत्पादक शेतकऱ्यांची दखलं
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
सातपूड्याचे पायथ्याशी असलेल्या अमरावती, अकोला, बुलढाणा ह्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण बारी समाज हा वंशपरांगत पद्धतीने गेली सत्तर, अंशी वर्षापासून सुरुवातीला पानवेली, व नंतरचे काळात पान पिपरी ह्या वनऔषधी ह्या पिकाची लागवड करत आहे , गेली दहा वर्षांपूर्वी या पिकावर येणाऱ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार म्हणून माजी राज्यमंत्री रामदासजी बोडखे ह्यांचे पुढाकारणे रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनाने अनुदान सुरु केले होते, परंतु सदरचे अनुदान हे सन २०१५/१६ पासून बंद करण्यात आले, ह्याबाबत ह्या भागातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी शासनाकडे मागणी केली असता अपंग पुनर्वसन मंत्री बच्चू भाऊ कडू ह्यांनी ह्या शेतकऱ्यासाठी विभागीय स्तरावर शासकीय समिती नेमून त्या मध्ये ह्या शेतकऱ्यांचे समस्यांबाबत निराकरण व्हावे ह्यासाठी पुढाकार घेतला, परंतु शासनाचे अधिकाऱ्यानी ह्या शेतकऱ्यांना अनुदान हे मनरेगा मार्फत वितरित करण्यात यावे यासाठी तरतूद केली,
वास्ताविक मनरेगा मधून मिळणाऱ्या अनुदानासाठी जॉब कार्ड ची अट असल्यामुळे जॉब कार्ड हे केवळ ग्रामीण भागातील लाभार्थी ह्यांचे साठी आहे, परंतु ९९% टक्के पानपिंपरी औषधी उत्पादक शेतकरी हे शहरी भागातील रहिवाशी असल्यामुळे त्यांना ह्याचा लाभ मिळत नसल्याची खंत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांचे भेटी दरम्यान शेतकरी मनोहर मुरकुटे, बारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशजी घोलप, सभापती राजेंद्रजी याउल, उमेश भोंडे, अनिलजी हिस्सल,देवीदासजी येऊल, रमेशजी डब्बे, संजय नाठे, दिनेश भोंडे,निलेश ढगे, वृषभ सातपुते, रुपेश येऊल,ह्यांनी बच्युभाऊ कडू ह्यांचे समोर ठेवली असता बच्चूभाऊ कडू ह्यांनी ह्यावर त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासित केले होते त्या अनुषंगाने नुकतीच मा.बच्चू कडू ह्यांचे पुढाकाराने नुकतीच अमरावती जिल्हा नियोजन भवन येथे माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू,विभागीयआयुक्त, जिल्हाधिकारी,जिल्हा कृषी सहसंचालक, कृषी अधीक्षक व पाचहीं जिल्ह्याचे सर्व विभा्गांचे अधिकारी ह्यांचे उपस्थितीत बैठक पार पडली ह्यामध्ये शेतकरी मनोहर मुरकुटे ह्यांनी पान पिपरी अनुदानामधील मनरेगा मार्फत हीं अट शिथिल करावी अन्यथा पूर्वीचे रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदान सुरु करावे ह्या बाबत उपस्थितांसमोर बाजू मांडली असता त्यावर बच्चू भाऊ कडू ह्यांनी त्वरित योग्य तो निर्णय व त्यावर तोडगा काढण्यासाठी ह्यामधील समस्यांबाबत शेतकऱ्यासोबत बैठक लावावी व प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या असता,जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते ह्यांनी त्वरित तिसऱ्याच दिवशी समितीचे शेतकऱ्यांसोबत बैठक लावून त्या मधील अनुदानाचा प्रलंबित प्रश्न , पानपिंपरीचे नवीन वानाची निवड , पानपिंपरी पिकाला लागवडीसाठी पीक कर्जाची तरतूद, पान पिपरी उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रक्षेत्र भेटी ई. मुद्यांवर सविस्तर अशी चर्चा करून सदरचा अहवाल शासनाकडे मंजूरातीसाठी पाठवीन्यात आला
ह्याप्रसंगी बैठकीला कृषी अधीक्षक राहुल सातपुते, कार्ड चे विजय लाडोळे, समिती सदस्य प्रभाकर ताडे, मनोहर मुरकुटे, गजानन अकोटकर, सुभाष थोरात, वृषभ सातपुते हे उपस्थित होते
सदरच्या अहवालावर शासन पुढे काय निर्णय घेणार ह्याकडे पानपिंपरी उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे