क्रिकेट सामन्यांचं बक्षीस वितरण सोहळा संपन्न
चांदुर रेल्वे
तालुका प्रतिनिधी
चांदुर रेल्वे येथे सुयश बहुउद्देशीय संस्थेमार्फत क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. क्रीडा मध्ये क्रिकेट सामने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले प्रथम पारितोषिक 20 हजार रुपये नगदी युवक काँग्रेस तर्फे मा. श्री. परीक्षेतदादा जगताप यांच्यातर्फे व चषक मॉर्निंग क्रिकेट क्लब चांदुर रेल्वे यांना देण्यात आले व द्वितीय पारितोषिक 10हजार रुपये मा. श्री हर्षल वाघ यांच्यातर्फे सी.आर. इलेव्हन क्रिकेट क्लब चांदूर रेल्वे देण्यात आले .बेस्ट ऑफ टीम पारितोषिक आर्वी क्रिकेट क्लब यांना देण्यात आले बेस्ट मन अमन ठाकूर बेस्ट बॉलर करण यांना देण्यात आले या बक्षीस वितरण सोहळा साठी मा.श्री . परीक्षितभाऊ जगताप (युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव,) मा .देवानंद भाऊ खुणे (न. प .उपाध्यक्ष )मा.श्री. संगपाल हरणे (शासकीय कॉन्ट्रॅक्टर ) मा .बंडूभाऊ आठवले (पत्रकार) मा. विवेक भाऊ राऊत (पत्रकार) मा.राजीवभाऊ शिवणकर (पत्रकार) शहजाद सौदागर मा .हर्षल वाघ, मा.सागर दुर्योधन, सुमेद सरदार ,अनिसभाऊ सौदागर ,अमोल ठाकरे, सागर माने या सर्वांच्या उपस्थितीत हे बक्षीस वितरण सोहळा करण्यात आले.सुत्रसचालन असेच अध्यक्ष सुमेद सरदार यांनी केले आभार राजीव शिवणकर यांनी मानले.