हटके

असे गाव जेथे आहे स्वतःचे न्यायालय 

Spread the love

बेगूसराय  / नवप्रहार मीडिया 

            पूर्वी गावातील वाद गावातच मिटवले जायचे. गावातील पंचायत गावातील कुठल्याही प्रकरणाचा निपटारा करत होते. कालांतराने बाहेरच्या व्यक्ती सोबत झालेले वादच नाही तर आपसातील वाद सुद्धा न्यायालयात जाऊ लागले. पण या स्थितीत देखील असे एक गाव आहे ज्या ठिकाणी फक्त खुनाचा गुन्हा सोडुन सगळ्याच प्रकरणाचा निपटारा केला जातो.

न्यायालयाप्रमाणेच याठिकाणी व्यवस्था केलेली आहे. न्यायाधीशाच्या खुर्चीवर सरपंच बसतात. तसेच लेखीकामासाठी सचिव असतात आणि कायदेशीर सल्ला देण्यासाठी सरकारी वकील असतात. याच सर्व परिस्थितीमुळे याठिकाणी IPC च्या कलम 302 सोडून सर्व प्रकारच्या प्रकरणांवर सुनावणी केली जाते.

विशेष म्हणजे ज्या गावात हे न्यायालय भरते, तेथील घटना आता कमी होत आहेत. पोलीस ठाण्यातील या गावाची प्रकरणे घटत असल्याचे सांगण्यात आले. लोकांना आता आपल्याच गावातील पंचायतीमध्ये न्याय मिळत आहे.

याबाबत विक्रमपुर गावाचे सरपंच रमेश सिंह यांनी सांगितले की, अवैध संबंध, चोरी, प्रेमप्रकरण आणि जमिनीच्या वादाची सर्वाधिक प्रकरणे न्यायालयात दाखल होतात. तर चेरिया बरियारपुर गावाचे सरपंच शंभू शरण यांनी लोकल18 बोलताना सांगितले की, सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एससी-एसटी प्रवर्गाच्या अर्जावर मोफत गुन्हा नोंदवला जातो. तर सर्वसाधारण जातीतील लोकांना 100 रुपये शुल्क भरावे लागते. अर्ज केल्यानंतर प्रथम माहितीची पावती दिली जाते. त्यानंतर दर शनिवारी ग्राम न्यायालयाचे कारकून दोन्ही पक्षासमोर सुनावणी घेतात.

या सुनावणीत दोषीला दंड भरावा लागेल किंवा शिक्षा म्हणून पीडितेची माफी मागावी लागते. तसेच 90 दिवसांत सुनावणीदरम्यान कोणताही तोडगा न निघाल्यास संबंधित प्रकरण स्थानिक पोलिस ठाण्यात वर्ग केले जाते. दर शनिवारी गावातील न्यायालयात 10 प्रकरणांची सुनावणी होते, अशी माहिती महेश कुशवाह यांनी दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close