श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय रासेयोतर्फे मेरी माती मेरा देश उपक्रमाअंतर्गत अमृत कलश निर्मिती
अंजनगाव सुर्जी: मनोहर मुरकुटे
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत देश ७७ वा स्वतंत्रदिवस साजरा करत असताना भारताच्या शूर सुपुत्रांचे स्मरण व्हावे तसेच भारताला विकसित देश बनवणे, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणे, एकता आणि एकता राखणे, नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडणे आणि राष्ट्राचे रक्षण करणाऱ्यांचा सन्मान करणे या उद्देशांसह देशातील शूर स्त्री-पुरुषांच्या सन्मानार्थ ‘मेरी माती मेरा देश’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. अभियानादरम्यान देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून ज्यामध्ये देशभरातील ७५०० कलशांमध्ये देशाची माती भरून ती दिल्लीला होहचवली जाणार आहे. या उपक्रमामध्ये अमृत कलश निर्मिती व अमृत वाटिका निर्मिती करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीमती राधाबाई सारडा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंजनगाव सुर्जी, जि.अमरावती येथे मेरी माती मेरा देश हा उपक्रम राबविण्यात आला. मेरी माती मेरा देश या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयामध्ये अमृत कलशाची निर्मिती करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बशिष्ठ चौबे, प्रा.प्रतिभा आवंडकर, प्रा. सुरेंद्र किन्हीकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. नितिन घोडीले, डॉ. अनिकेत भुयार, डॉ. ममता येवतकर व डॉ. नविता मालाणी आदींची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अंजनगाव परिसरातील माती आणून एक मुट्टी माती अमृत कलशात टाकत सेल्फी काढून केंद्र सरकारनी सुचविलेल्या वेबसाईट वर अपलोड करण्यात आला. यामध्ये महाविद्यालायातील समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सहभाग लाभला. यामध्ये डॉ. नितीन सराफ, डॉ. अंशुमती पेंडखरे, डॉ. जुगल मालधुरे, डॉ. मंगेश डगवाल, डॉ. समीर बिजवे, डॉ. इंदल जाधव, डॉ. सतिष मार्डीकर, डॉ. पवन राऊत, डॉ.चतुरानंद केदार, डॉ. विवेक पाटील रासेयो स्वयंसेवक गोवर्धन प्रजापती, शेख अवेस, कृष्णकांत कडु, अर्चना वानेरे, अस्मिता वानेरे, गायत्री देशकर, प्रतीक्षा दाळु, आदींचा सहभाग लाभला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरीता श्री. प्रल्हाद लोयटे, सुनिल बेलसरे तसेच रासेयो स्वयंसेवक प्राची राऊत, निकिता सातपुते, कुणाल बारेवार सेजल राक्षसाकर, महिमा कुकडे, भरावी मिसळे, प्रतिक्षा अभ्यंकर, सर्वेश रोही, श्याम इंगळे व बुध्द्धभूषण धोके आदींचे सहकार्य लाभले.