सामाजिक
सुमेध बुद्ध विहार एकोडीच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन
साकोली: सुमेध बुद्ध विहार एकोडी च्या वतीने ७ फेब्रुवारीला मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने एकोडी येथे भव्य आरोग्य मेळावा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, त्वचा तपासणी, दंत चिकित्सा, बि. पी.शुगर तपासणी,जनरल तपासणी, कॅन्सर तपासणी, होणार असून रक्तदान शिबीर सुद्धा आयोजित केले आहे.
या शिबिराला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील तज्ञ डॉक्टरांची चमू पाठविण्यात यावी याकरिता जिल्हा शल्यचिकित्सक (बाह्य) डॉ.अतुल टेम्भूर्णे तथा रक्तपेढी जन संपर्क अधिकारी राजू नागदेवे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ग्रा.पं.सदस्य भावेश कोटांगले, मनोज कोटांगले, सुमेध बुद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष मिथुन जांभुळकर, सचिव कार्तिक मेश्राम उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1