ग्रीष्मकालीन व्हॉलीबॉल व कबड्डी प्रशिक्षण शिबिराला प्रचंड प्रतिसाद…
आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा व आर्वी तालुका क्रीडा संकुल समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णकालीन हॉलीबॉल व कबड्डी प्रशिक्षण शिबिराला प्रचंड प्रतिसाद सतत पंधरा दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये खेळाडू व्हॉलीबॉल व कबड्डीचे धडे गिरवणार आहे सदर खेळाडूंना व्हॉलीबॉल या खेळाची तंत्रशुद्ध माहिती व कौशल्य तालुका क्रीडा मार्गदर्शक कपिल ठाकूर सांगणार आहे व कबड्डी या खेळाची तंत्रशुद्ध माहिती तालुका क्रीडा मार्गदर्शक अनिल चव्हाण सांगणार आहे सतत 15 दिवस चालणाऱ्या शिबिरामध्ये खेळाडूंना दररोज सकाळी सकस आहाराची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती तालुका क्रीडा मार्गदर्शक कपिल ठाकूर यांनी दिली आज विद्यार्थी भ्रमणध्वनीच्या विळख्यात सापडले आहे आणि त्यांनी मैदानाकडे पाठ फिरवली आहे कुठेतरी पुन्हा एकदा या चिमुकल्यांची मैदानाकडे आनंदाने उत्साहाने वाटचाल व्हावी व आजचे बालक नियमित व्यायाम करून उद्याचे बलशाली युवक होतील असा आशावाद तालुका क्रीडा मार्गदर्शक कपिल ठाकूर यांनी व्यक्त केला आहे सदर शिबिराला सर्व क्रीडाप्रेमींनी एकदा अवश्य भेट द्यावी व चिमुकल्यांचा उत्साह द्विगुणीत करावा अशी विनंती तालुका क्रीडा मार्गदर्शक कपिल ठाकूर यांनी केली आहे.