सामाजिक

कॉस्मेटिक कंपनीला आग ; 15 ते 20 मजूर अडकले , दोघांनी टाकल्या छतावरून उड्या

Spread the love

सोलन (हिमाचल ) / नवप्रहार मीडिया

हिमाचल प्रदेश सोलन  जिल्ह्यातून  यरक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बडीच्या झाडामाजरी येथील जका कॉस्मेटिक कामापाणीला लागलेल्या आगीत 15 ते 20 मजूर अडकले आहेत.दोन मजुरांनी जीव वाचविण्यासाठी छतावरून उड्या टाकल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यरक महिला छतावर डकल्याचे दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील औद्योगिक शहर असलेल्या बड्डीच्या झाडामाजरी येथे ही घटना घडली. येथील कॉस्मेटिक उत्पादने बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार अडकले आहेत. आगीचे कारण समजू शकलेले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाच्या बड्डी आणि नालागडच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफची टीम मदत आणि बचावासाठी घटनास्थळी पोहोचली आहे.

आग लागल्यानंतर या घटनेचे काही व्हिडीओही समोर आले आहेत, यामध्ये लोक कारखान्याच्या बाहेर धावताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये फॅक्टरीच्या छतावर एक महिलाही दिसत आहे. धुरामध्ये ही महिला अडकली आहे. एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती १५-२० लोक कारखान्यात अडकल्याचे सांगताना दिसत आहे.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close