सामाजिक

पंगडी रस्त्याचे बांधकाम गांधीगिरी करुन युवांनी घेतले हाती

Spread the love

 

 

 बांधकाम प्रशासन व लोकप्रतिनिधीला कंटाळून पंगडी येथील युवका कडून लोकवर्गणीतून रस्त्याचे काम सुरू

 

घाटंजी ता.प्रतिनीधी- सचिन कर्णेवार

 घाटंजी-गेल्या अनेक वर्षापासून घाटंजी ते कुर्ली हा अत्यंत महत्त्वाचा समजणारा विदर्भ- मराठवाडा तसेच विदर्भ – तेलंगणा जोडणारा प्रमुख रस्ता असून अतिषय खराब अवस्थेत आहे.पंगडी गावकरी यांचे कडून वारंवार शासनाकडे आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा करूनही घाटंजी ते कुर्ली या रस्त्याकडे प्रतिनीधीचे दुर्लक्ष असल्याने अखेर गांधारी करुन गावातील यूवकांनी स्वत: पुढाकार घेत रस्त्याचे काम हाती घेतले. मुजोर प्रशासन व झोपेचे सोंग घेतलेले लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षितपणामुळे पंगडी येथील तरुण पिढी आणि ग्रामस्थांकडून लोकवर्गणी जमा करून रोडचे खड्डे बुजवून डागडुजी करून गांधीगिरी करण्यात आली.विदर्भ आणि मराठवाड्याला तसेच विदर्भ ते तेलंगणाला जोडणारा आणि महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या घाटंजी ते कुर्ली या मार्गावर येणारे गाव अनेक वर्षापासून विकास कामांपासून वंचित आहे.या रस्त्या शी संबंधित पंगडी,आमडी, सायतखर्डा,बोदडी,झटाळा, रायसा या गावकऱ्यांकडून वेळोवेळी या रस्त्याचा कामाबद्दल निवेदन देऊन सुध्धा शासनाने केवळ वेळकाढू पणा घेतला आहे.गावातील आजारी रुग्ण, बाळंतीण,विद्यार्थी, शेतमाल वाहणारे शेतकरी,मालवाहू गाडी चालक, बस चालक, दुचाकी चालक यांना या रस्त्याचा अनेक वर्षापासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे, या सर्व जाचाला कंटाळून पंगडी येथील युवक वर्ग शुभम ठाकरे,अतुल भोयर,संकेत धांदे,नयन उदार, सचिन भोयर,अतुल ठाकरे,सोनू किन्हेकर,सदानंद भोयर, अभिषेक राऊत,प्रवीण राऊत, अजय खडसे,अजय गादेवर, काशिनाथ बावणे,नीरज कनाके, विशाल मेश्राम,निखिल मुनेश्वर, संचित ठाकरे,सूरज चव्हाण आणि युवावर्ग यांनी हे काम हाती घेतले.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close