पुसद अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी शरद मैंद*सलग पाचव्यांदा अविरोध निवड
राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद अर्बन बँकेची २०२३ ते २०२८ या पाच वर्षासाठी संचालक मंडळाची अविरोध निवड झाली होती. त्यानंतर आज २४ जुलै रोजी झालेल्या विशेष सभेत शरद मैंद यांची बँकेच्या अध्यक्षपदी पाचव्यांदा अविरोध निवड झाली. राकेश खुराणा यांची उपाध्यक्षपदी अविरोधक निवड झाली यावेळी नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदी विक्रमी सलग पाचवी वेळ अविरोध निवडून येण्याचा पूर्ण महाराष्ट्रातील ही दुर्मिळ निवड म्हणावी लागेल . पुसद अर्बन बँकेत आज दुपारी १ वाजता जिल्हा उपनिबंधक व अध्यासी अधिकारी नानासाहेब चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची सभा संपन्न झाली. यावेळी सहायक निबंधक सुनील भालेराव पुसद, सहाय्यक निबंधक सचिन कुडमेथे वणी, सहकार अधिकारी अनिल सुरपाम पुसद, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक सेवकर पुसद अर्बन बँक चे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.