काँग्रेसचे शब्बीर खान यांचा यवतमाळ विधानसभेकरीता दावा
– यशोमती ठाकुर, माणिकराव ठाकरे, वजाहत मिर्झा यांना दिले निवेदन
–
यवतमाळ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभाग चे उपाध्यक्ष शब्बीर खान यांनी यवतमाळ विधानसभेकरीता आपला दावा सांगीतला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी यशोमती ठाकुर, माणिकराव ठाकरे, वजाहत मिर्झा यांना यवतमाळात दिले आहे. शब्बीर खान हे मागील 24 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत असून विविध पदाची जवाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे. ते यवतमाळ नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून ही निवडून आले होते. काँग्रेस पक्षाकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या विविध आंदोलनामध्ये, उपक्रमामध्ये ते सक्रीय सहभागी झाले आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर जो विश्वास दाखविला, जनतेची सेवा करण्याची जी संधी दिली त्यांनी ती पुरेपुर सांभाळल्याचे निवेदनातून म्हटले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेवून कार्यकर्ते, यवतमाळकर नागरीकांची तसेच मुस्लिम समाजाची अशी इच्छा आहे की त्यांनी काँग्रेस पक्षाकडून यवतमाळ विधानसभेची निवडणुक लढवावी. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मुस्लीम नेत्यास उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे मुस्लीम समाजामध्ये काँग्रेस पक्षाप्रती रोष निर्माण होत आहे. हा रोष मिटविण्याकरीता काँग्रेसने मुस्लीम समाजातील प्रामाणिक नेत्याला विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी द्यावी असे मत त्यांनी निवेदनामध्ये त्यांनी व्यक्त केले.