क्राइम

आता याला काय म्हणाल ….?  गोवंश सोबत अनैसर्गिक कृत्य  आणि व्हिडिओ केला व्हायरल 

Spread the love

चंद्रपूर / नवप्रहार ब्युरो

               लोकांच्या मानसिकतेला काय झालं आहे हे कळेनासे झाले आहे. याला विकृत मानसिकता म्हणावी की आणखी काही ? असा प्रश्न या घटनेने उपस्थित होत आहे.

                चंद्रपूर मधून एक धक्कादायक , संतापजनक आणि घृणास्पद प्रकार समोर आला आहे. येथे काही तरुणांनी गोवंश सोबत अनैसर्गिक कृत्य केले आहे. आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. सत्यनारायण खेंगर यांच्या तक्रारी नंतर या विकृत मानसिकतेचा तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

प्रल्हाद राठोड (65), विजय पाल (22), हर्षल घोटेकर (27), विजय ढोके (26), पुरुषोत्तम सहारे (42), नरेश वर्मा (32) शुभम खोब्रागडे (29) अशी आरोपीची नावे असून हे सर्व आरोपी बल्लारपूर शहरातील आहेत.पोलिसांनी यांना अटक केली आहे.

6 जून रोजी इट्स चंद्रपूर या इन्स्टाग्राम पेजवर ‘रात गोमाता के साथ, दृष्कर्म का प्रयास’ या शीर्षकाखाली बल्लारपूर-कारवा रोडवर गोमातेसह अनैसर्गिक कृत्य करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. 7 जून रोजी बकरी ईद असल्याने हा व्हिडीओ सर्वत्र चांगलाच पसरला. या व्हिडीओमुळे अनेकांचा भावना दुखावल्या. सुभाष वॉर्ड, बल्लारपूर येथील सत्यनारायण खेंगर यांनी याबाबत बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. बल्लारपुरातील पोलीस निरीक्षक गव्हाणे यांनी कलम 299, 3 (5) बीएनएस सहकलम 67 माहिती तंत्रज्ञान अन्वये गुन्हा नोंदवून तपास करण्यात आला. गोवंशासोबत अनैसर्गिक कृत्य करणारे, व्हिडीओ बनवणारे आणि व्हिडीओ शेअर करणाऱ्या सातही जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे करीत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close