राजकिय

आ.नितेश राणे सह दोघा मंत्र्याला कोर्टाचे हाजिर हो $$$$

Spread the love
सिंधुदुर्ग / विशेष प्रतिनिधी 


            कोरोना कालावधीत प्रतिबंध असताना देखील आंदोलन करण्याच्या सबबीखाली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अन्य दोन नेत्यांसह कोर्टाने अटक वॉरंट बजावले आहे. राणें सह आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. न्यायालयाने या तिन्ही नेत्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट  जारी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय?

हे प्रकरण २६ जून २०२१ रोजी झालेल्या ‘ओबीसी आरक्षणा’च्या आंदोलनाशी संबंधित आहे. कोरोनाचे निर्बंध लागू असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात नितेश राणे, निलेश राणे, राजन तेली यांच्यासह एकूण ४२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.

न्यायालयाने का ओढले ताशेरे?

आज कुडाळ न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणीस आमदार निलेश राणे, राजन तेली आणि इतर काही आरोपी उपस्थित होते. मात्र, कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य ५ आरोपी गैरहजर राहिले. नितेश राणे हे यापूर्वीही अनेकदा न्यायालयाच्या तारखांना अनुपस्थित राहिले आहेत. वारंवार गैरहजर राहण्याच्या या भूमिकेवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

या प्रकरणात नितेश यांच्या वकिलांनी विनंती अर्ज केला होता. दरम्यान, न्यायालयात नितेश राणे यांच्या वकिलांनी दिलेला विनंती अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला आहे आणि थेट अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्याचे आदेश दिले. तसेच, संविधान बचाव आंदोलनाशी संबंधित प्रकरणात प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनाही न्यायालयाने दणका दिला आहे.

राजकीय चर्चांना उधाण

सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्यांविरुद्ध थेट अजामीनपात्र वॉरंट निघाल्याने प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर हालचाली वेगवान झाल्या आहेत. आता या कारवाईनंतर मंत्री नितेश राणे आणि दोन्ही आमदार न्यायालयात हजर होऊन हे वॉरंट रद्द करून घेतात की पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close