स्वच्छता गृह त्वरीत सुरू करुन नागरिकांची अडचण दुर करा
आर्वी शहर सुधारक समितीची मागणी
आर्वी,/ प्रतिनिधी
:- शहराच्या आठवडी बाजारातील स्मार्ट स्वच्छता गृह व नेताजी सुभाष चंद्रबोस पुतळ्या लगतचे जुन स्वच्छता गृह त्वरीत सुरू करुन नागरिकांच्या अडचणी दुर करा अशी मागणी आर्वी शहर सुधारक समितीची असुन त्यांनी बुधवारी (ता.पाच) नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाडकर यांना निवेदन दिले आहे.
इंदिरा मार्केट आठवडी बाजारा करीता येणाऱ्या नागरिकांची व त्या परिसरातील व्यवसायीकांच्या सोयी करीता गत चार महिण्यापुर्वी नगर परिषदेने हजारो रुपये खर्च करुन आधुनीक पध्दतीचे स्मॉर्ट स्वच्छता उभे केले मात्र याला लागणाऱ्या पाण्याची सोय केली नाही. परिणामी ते निरोपयोगी ठरत असल्याने नागरिकांची व व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. महिलांना अनेक अडचणीला समोर जावे लागत आहे.
तर दुसरीकडे नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळ्या लगत सुमारे २५ वर्षा पुर्वी पासुन स्वच्छता गृह बांधुन पडले आहे. याचे अजुन पर्यंत उद्घाटन सुध्दा झाले नाही . आज पर्यंत एकाही व्यक्तीला याचा उपयोग झाला नाही. मात्र नगर परिषदेच्या मुक संम्मतीने काही व्यक्ती गोदम म्हणुन याचा वापर करीत आहे.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मेरा भारत स्वच्छ भारत चा नारा देतात मात्र दुसरीकडे नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य पसरण्यास मदत होत आहे. हि फार खेद जनक व लज्जास्पद गोष्ट असुन याकडे नगर परिषदेने त्वरीत लक्ष देणे गरजेचे आहे. दोन्ही ठिकाणचे स्वच्छता गृह सर्व सुवीधेसह नागरिकांच्या सोयी करीता उपलब्ध करुनु देण्यात यावे अशी मागणी आर्वी शहर सुधारक समिती ची आहे.
निवेदन देणाऱ्यांमध्ये मनोज आगरकर, सतीश शिरभाते, इश्वर नागपुरे, मंगेश इंगळे, रवी तळेकर, अतुल जयसिंगपरे, अभीजीत भिवगडे, इमरान पठाण, पवन पडोळे, कुंदन चकोले, सतीश गुल्हाणे, संजय चिंधेकर, देवीदास डाफे, निनावे, इत्यादींची उपस्थिती होती.