क्राइम

सांडपाण्याची टाकी साफ करतांना सापडली कवटी आणि पकडल्या गेली सटवी 

Spread the love

शिवगंगा ( तामिळनाडू )/ नवप्रहार मीडिया 

                       मनुष्याचा पापाचा घडा भरला की त्याचे कृत्य आपोआप समोर येतात याची प्रचिती तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील देवकोट्टई येथे घडलेल्या एका प्रकरणात आली आहे.

आरोपी – सुकांती

                      नऊ वर्षांपूर्वी गंबर स्ट्रीट येथे भाड्याने राहणारा पंडियन हा एक दिवस अचानक गायब झाला होता. त्याची पत्नी असलेल्या सुकांती ला जेव्हा शेजाऱ्यांनी पांडियन बद्दल विचारणा केली तेव्हा तिने त्यांना सांगितले की तिचा पती बाहेरगावी गेला तो परतलाच नाही. गोष्ट आलिगेली होऊन गेली. त्यानंतर ती महिला ती एरिया सोडून दुसरीकडे राहायला गेली.

 अस आलं प्रकरण चव्हाट्यावर – घरमालकाने सांडपाण्याची टाकी साफ करायला मजुरांना बोलवले. टाकी साफ करत असताना मजुरांना पाण्यात एक मानवी कवटी सापडली. त्यामुळे घाबरलेल्या घर मालकाने याबद्दल पोलिसांना कळवले. माहिती मिळताच देवकोट्टाई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांना या बद्दल विचारणे सुरू केले. दरम्यान टाकी उपसने चालू असल्याने त्यात आणखी मानवी हाडे आणि शर्ट व एक लाल रंगाचा धागा सापडला.त्यामुळे शंका आल्याने पोलिसांनी सुकांती हिचा शोध घेणे सुरू केले.

त्याच क्षेत्रात राहत होती सुकांता – सुकांता जेथे राहायला गेली होती तिथे देखील तिने तीच स्टोरी सांगितली होती. पोलिसांनी तिला गाठून विचारणा केली असता तिने पोलिसांना सांगितले की तिचा नवरा कोयम्बतुरला एका बाईसोबत राहतो .आणि दर महिन्याला तिला पैशे पाठवतो.पण पोलिसांना तिच्या बयानावर विश्वास बसला नाही. मात्र पोलिसांनी त्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. त्यांनी सुकांती विषयी तपास करायला सुरुवात केली.

सुकांती ने कबूल केला गुन्हा – पोलिसांना सुकांती वर संशय आप्याने त्यांनी तिला पोलिसी खाक्या दाखवताच ती पोपटा  सारखी बोलू लागली.सांडपाण्याच्या टाकीत सापडलेली ती कवटी आपल्या पतीचीच असल्याचं तिने मान्य केलं. त्यात सापडलेली हाडं, शर्ट हे तिच्या पतीचे असून तिने स्वत: पतीचा मृतदेह सांडपाण्याच्या टाकीत फेकल्याचं पोलिसांजवळ कबूल केलं.अधिक तपास करण्यासाठी त्याच्या मृत्यूच्या दिवशी काय घडलं हे जाणून घेणं गरजेचं होतं. तसा तपास पोलिसांनी सुरू केला .

पांडियन च्या बहिणीने कथन केला किस्सा – या बद्दल पांडियन यांची बहीण सुधा हिला पोलिसांनी विचारणा केली तेव्हा पोलिसांना सांगितलेली माहिती धक्कादायक होती. माझा भाऊ लठ्ठ होता. त्यामुळे त्याच्या पत्नीने एकटीने मृतदेह पाण्यात टाकला असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पोलिसांनी तपास करून यामागील लोकांचा शोध घ्यावा,” असं सुधा म्हणतात.

पांडियन च्या सावत्र वडिलांना देखील सुनेवर होती शंका – या प्रकरणावर बोलताना मृताचे सावत्र वडील सिद्धप्पा शेखर म्हणाले की, त्यांनाही पांडियन बेपत्ता झाल्याबद्दल शंका होती. त्यांनी सांगितले की, “मी माझ्या नातेवाईकांना 6 वर्षांपूर्वी सांगितलं होतं की, सुकांती हिने माझ्या मुलाला मारून नदीत फेकून दिलं आहे. पण मला दारूचं व्यसन असल्याने कोणीही माझं ऐकलं नाही.”

ते पुढे म्हणाले की, “घराच्या सांडपाण्याच्या टाकीतून हाडं आणि कवटी काढली तेव्हा माझ्या सुनेने आम्हाला याची माहिती दिली. मग आम्ही तिथे गेलो आणि तो पांडियन असल्याचं सांगितलं. पोलिसांनी हत्येचा तपास करून यामागे असलेल्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close