राजकिय

लालाजीचा फोटो लावून अपक्ष ऊमेदवार करतो स्व लालाजीचा अपमान

Spread the love

असला प्रकार लालाजी समर्थक सहन करनार नाहीत

बाळासाहेब नेरकर कडून

अकोला एकीकडे लालाजी चा फोटो लावायचा दुसरीकडे अकोल्याचा विकास झाला नाही या नावाने ऑडिओ कॅसेट व्हिडिओ कॅसेट बनवून लालाजीचा अपमान करायचा असा प्रकार अपक्ष उमेदवार करत असेल तर तो प्रकार भाजपा आणि महायुतीचे कार्यकर्ते तसेच लालाजी समर्थक सहन करणार नाही अशा कृतीचा जाहीर निषेध भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर पाटील यांनी केला आहे. या संदर्भात लालाजीच्या फोटो लावण्याच्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे अपक्ष उमेदवारांच्या विरोधात तक्रार कृष्णा शर्मा यांनी केली असून सिद्धेश्वर मंदिर ला जागा द्यायची नाही आणि ऑडिओ आणि व्हिडिओ कॅसेटमध्ये अकोल्याचा विकास झाला नाही असा आरोप करून लालाजीचा अपमान करण्याचा प्रकार अपक्ष उमेदवारांनी लावला आहे हा प्रकार निंदनीय असून असा प्रकारच्या विरोधात निवडणूक आयोगाने पोलिसांकडे तक्रार करण्यात येणार आहे त्यांनी ताबडतोब अकोले करांची राजेश्वर नगरीची माफी मागावी आणि लालाजी चा फोटो ताबडतोब काढावा अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल लालाजी हे सर्वसामान्य आणि एकनिष्ठ पक्षाच्या विषयी विस्ताराच्या विषयी तळमळ असणारे नेतृत्व असून कोणत्याही बंडखोराला महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका ग्रामपंचायत मध्ये सुद्धा त्यांनी समर्थन दिला नाही आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला सुद्धा समर्थन दिलं नाही. नितीन जोशी त्याचे उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले. पक्षाच्या संदर्भात सातत्याने तिकीट मागणारे परंतु पक्षाची एकनिष्ठ असणारे सिद्धार्थ शर्मा मोतीसिंह मोहता कृष्णा शर्मा तसेच किशोर पाटील सह स्वतः व 19 जणांनी हे चांगले उदाहरण नसल्याचे त्यांनी सांगितले पक्षाच्या विरोधात बंडखोरी न करता पक्षाचा आदेश मानून पक्षांनी दिलेल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी काम करण्याची ही संधी आहे ज्यांची संधी साधू आणि कोणत्याही व्यक्ती आणि पक्षावर निष्ठा नसणारे धंदेवाईक लोकांना त्यांची जागा जनता जनार्दन दाखवल्याशिवाय राहणार नाही असाही विश्वास किशोर पाटील यांनी व्यक्त केला आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close