नांदगावातील विविध समस्या घेऊन शिवसेनेच्या नेतृत्वात नागरिकांची न प वर धडक
आठ दिवसांत समस्या सोडवा अन्यथा आंदोलन मुख्याधिकारी यांना निवेदन सादर*
नांदगाव खंडेश्वर / संदीप अंभोरे
स्वच्छतेवर शासनाचे वर्षाकाठी करोडो रुपये खर्च होत असून नांदगाव शहरात नगर पंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेने शहरातील स्वच्छेतेची पार ऐशी तैशी झाल्याचे पाहायला मिळते येते यासह शहरातील विविध समस्या घेऊन नागरिकांनी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात नगर पंच्यातवर धडक देऊन मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आठ दिवसांत समस्या निकाली काढा अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला
शहरातील स्वचतेची दयनीय असलेली परिस्थिती मुख्यधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्या करिता नागरिकांनी शहरातील जुन्या आठवडी बाजारातील कन्या शाळे समोरील साचलेले कचऱ्याचे ढिगारे पाण्याचे साचलेले डपके शहरातील खंडेश्वर मंदिर बारी पुरा गोवारी पुरा पहूर रोड दांडगे कॉलनी या परिसरातील अनेक महिन्या पासून बंद असलेले पथदिवे बस स्टॅन्ड वरील शौचालय व मुत्रीघराची दयनीय अवस्था पायका ग्राउंड वरील वाढलेले गवत त्या ठिकाणी असलेली ओपन जिम सभोवताली गांजर गवताचा विळखा यासह इत्यादी समस्या घेऊन नगर पंच्यातला निवेदन सादर केले दरम्यान नागरिकांची आक्रमक भूमिका पाहता मुख्याधिकारी नंदू पडळकर यांचेसह अभियंता शैलेंद्र मेटे शेख राहील यांनी प्रत्यक्ष समस्येच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली यावेळी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर शहर प्रमुख निलेश इखार शेख जहीर पवन शिरभाते समीर शेख, शेख मोनू शुभम रावेकर अक्षय हिवराळे अनिकेत गटुले इत्यादी नागरिक उपस्थित होते
——————————–
*नांदगाव नगर पंचायतचा कारभार अंदाजे चार वर्षांपासून प्रभारी मुख्याधिकारी असल्याने शहरातील समस्येत वाढ झाली आहे शासनाने तात्काळ नियमित मुख्याधिकारी यांची नियुक्ती करावी*