कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा निमसाखर ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार…

भरणेवाडी /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या कृषीमंत्री पदी दत्तात्रय भरणे यांची नुकतीच नियुक्ती झाल्याचे सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अजित पवार गट यांनी आनंद व्यक्त करीत जल्लोष केला.मंत्री दत्तात्रय भरणे यांचा नागरी सत्कार निमसाखर येथील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भरणेवाडी ता.इंदापूर येथील निवासस्थानी केला.यावेळी श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना माजी संचालक अभिजित रणवरे ,इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग, निमसाखर चे सरपंच धैर्यशील रणवरे,तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पाटील,कार्यकर्ते विकास रणसिंग, दिपक लवटे,रामभाऊ रणसिंग,सुलेख रणवरे ,अतुल रणवरे इ मान्यवर उपस्थित होते.मंत्री भरणे यांना शुभेच्छा देत कार्यकर्त्यांनी नागरी सत्कार केला.इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी सांगितले कि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या शेतकरी कुटूंबातील नेतृत्वाला कृषीमंत्री पद मिळाले यांचे समाधान माझ्यासारख्या हजारो कार्यकर्ते व लाखो शेतकऱ्यांना झाले असून भविष्यात इंदापूर तालुक्यासह राज्यात कृषी विभागाच्या माध्यमातून मंत्री भरणे मामा यांच्या हातून समाधानकारक कामगिरी होणार असल्याचे सांगितले.