चिखल वर्धा ग्रामपंचायत मध्ये शांतता समिती बैठक संपन्न
घाटंजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार
आगामी गणेश उत्सव,पोळा सना निमित्त शांतता समिती बैठक दी. 1 शुक्रवारला संध्याकाळी 6 वाजता चिखल वर्धा येथे संपन्न झाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी पारवा पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रविण लिंगाडे साहेब होते तर, प्रमुख पाहुणे म्हणून पो.उपनीक्षक वानखेडे,बिट जमादार मुंडे,पो सी वाडई, सरपंच आकाश नडपेलवार, ग्रामपंचायत सदस्य जैतुजी मेश्राम तथा माजी सरपंच, अर्जुन जाधव, कुसुम चव्हाण आदी उपस्थित होते.कार्यक्रम प्रसंगी पारवा ठाणेदार लिंगाडे यांचा शाल श्रिफळ देउन सत्कार आदिवासी समाजाचे महाजन सखाराम कुळसंगे यांचे हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाला
मोठ्या संख्येने बचत गटाच्या महीला,आशा स्वयंसेविका,मंगला कनाके,निता कनाके,गुंफा जाधव,जया कनाके, सुधाकर चव्हाण पारवा सोसायटी उपाध्यक्ष,पोलीस पाटील गणेश कुमरे,रमेश राठोड सा, कार्यकरता,मुस्लिम धर्म गुरू हफीज साहेब,रफीक पटेल जेष्ठ नागरिक,लक्ष्मण भाऊ केळझरकर सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण नेवारे,अबरार पटेल तं.मु अध्यक्ष,शाळा स.मी अध्यक्ष विलास नेवारे,मारोती मडावी, कैलास जाधव,शिवराम जाधव, जोतीराम चव्हाण,पुनाजी मेश्राम, अशपाक शेख,वसिम पठान, जुबेर खान,सचिन बोटरे ,शंकर धुर्वे आदी उपस्थित होते.कार्यम संचालन कुमरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रमेश राठोड यांनी मानले.