राजकिय

वाचा अजित पवारांवर कोणता होतोय आरोप

Spread the love

पुणे / नवप्रहार मीडिया नेटवर्क

                    राष्ट्रवादीत बंड पुकारून अजित पवार आपल्या  समथित आमदारांसह सरकार मध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या चिन्हावर दावा देखील ठोकला आहे.असे होत असताना त्यांच्यावर शरद पवार यांच्या सोबत असलेल्या आमदारांवर दबाब टाकल्या जात असल्याचा आरोप होत आहे. कोण आंहेत हे दोन आमदार ? आणि काय आहे या आरोपा मागील सत्य जाणून घेऊ या.

           पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 10 आमदार असल्याने हा जिल्हा राष्ट्रवादीचा गढ म्हणून ओळखला जातो. पण अजित दादा यांनी बंड पुकारल्यावर 10 पैकी 8 आमदार अजित दादा सोबत आहेत.तर 2 मोठ्या पवारां सोबत.   शिरूरचे आमदार अशोक पवार अजित दादांच्या शपथविधीला हजर राहूनही पुन्हा शरद पवार गटातच राहिलेत. कारण शिरूरच्या जनतेचा पाठिंबा दादांपेक्षा साहेबांना अधिक आहे. पण आता अजितदादाने शिरूर तालुक्यात जरा जास्तच लक्ष घातल्याचं दिसतंय. गेल्याच आठवड्यात दादांनी बाबुराव पाचर्णे यांच्या स्मृति दिन कार्यक्रमाला हजेरी लावत साहेब आणि मी एकच असल्याचा माईंड गेम खेळून पाहिला.त्यापाठोपाठ आज पुन्हा घोडगंगा साखर कारखाना कामगार प्रश्नात लक्ष घालून त्यासंबंधी साखर संकुलात मिटिंग लावली.

शिरूरचे आमदार अशोक पवारही या बैठकीला उपस्थित होते. कारण तेच कारखान्याचे अध्यक्ष आहेत. दरम्यान, हडपसरचे आमदार चेतन तुपेही आज तिथंच अजित पवारांना भेटायला आलते. त्यामुळे शरद पवार गटात राहिलेल्या या दोन्ही आमदारांवर अजित पवार दबावतंत्राचा वापर तर करत नाहीत ना?

असा आरोप होऊ लागला आहे. अजित पवारांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत. पवार पुन्हा मैदानात; भुजबळांनंतर आता या मंत्र्याच्या बालेकिल्ल्यात धडाडणार तोफहडपसरचे आमदार चेतन तुपे यांच्या कार्यकर्त्यांनी तर मध्यंतरी दादा गटात सामिल झाल्याचे पोस्टर्सही झळकवले होते. त्यावर स्वत: आमदारांनीच आपण अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचा खुलासा केलाय तर दुसरीकडे शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी आपला तालुकाध्यक्ष यापुर्वीच दादा गटात धाडून ठेवलाय. म्हणूनच उरलेले दोन्हीही आमदार उद्या उठून अजितदादा गटात गेल्यास अजिबात आश्चर्य वाटणार नाही. पण या दोन्ही मतदारसंघात शरद पवारांना मानणारा मोठा दबावगट असल्याने या दोन्ही आमदारांची राजकीय कोंडी होत असल्याचे बघायला मिळतंय.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close