क्राइम

चुलबुल पांडे उर्फ गुरुसिधप्पा च्या हत्येत प्रेयसी चा सहभाग ? 

Spread the love

वरळी / नवप्रहार डेस्क 

               स्पा सेंटर मध्ये झालेल्या मर्डर केस मध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत. यात पोलिसांनी नवा खुलासा केला आहे. पोलिसांनी गुरुसिद्धप्पा वाघमारेच्या गर्लफ्रेंडला अटक केली आहे. हत्येमागे तिच्या गर्लफ्रेंडचा देखील हात असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. गुरुसिधप्पा उर्फ चुलबुल याची स्पा सेंटर मध्ये हत्या करण्यात आली होती.

 वरळीच्या स्पामध्ये घडलेल्या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. यात गुरु वाघमारे उर्फ चुलबुल पांडे याची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

यात पोलिसांनी नवा खुलासा केला आहे. पोलिसांनी गुरुसिद्धप्पा वाघमारेच्या गर्लफ्रेंडला अटक केली आहे. हत्येमागे तिच्या गर्लफ्रेंडचा देखील हात असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

वरळी पोलिसांनी गुरुसिद्धप्पा वाघमारेच्या गर्लफ्रेंडला अटक केली आहे. हत्येच्या रात्री वाघमारेची मैत्रीण मेरी जोसेफ त्याच्यासोबत होती. मेरीला कटाची माहिती असताना देखील तिने वाघमारेला स्पा मध्ये बोलावल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच वाघमारेच लोकेशन आरोपिंसोबत तिनेच शेअर केल्याचा दावा पोलिसांनी केलाय.

गुरुसिद्धप्पा वाघमारे हा कथित आरटीआय कार्यकर्ता आणि पोलिसांच्या खबऱ्या असल्याची माहिती आहे. तो स्पा आणि मसाज पार्लरकडून खंडणी उकळण्याचा असा आरोप आहे. त्यामुळेच वाघमारेच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. आपल्या जीवाला धोका आसल्याच्या भीतीने २२ संशयितांची नावे वाघमारेने दोन्ही पायांवर आणि पाठीवर गोंदवली होती.

गुरु वाघमारे हा ५२ वर्षांचा होता. त्याच्या विरोधात बलात्कारासह अनेक गुन्ह्यांची नोंद होती. त्याने वाढदिवसादिवशी जोरदार पार्टी दिली होती. त्यानंतर तो वरळीतील स्पामध्ये आला होता. येथे त्याच्या ओळखीचे लोक होते. त्याची २१ वर्षीय गर्लफ्रेंड देखील त्याच्यासोबत होती. यावेळी तीन-चार जण त्याठिकाणी आले अन् त्यांनी धारदार शस्त्राने त्याला भोसकण्यास सुरुवात केली होती. यातच त्याचा मृत्यू झाला होता.

गुरु वाघमारेने २२ जणांची नावे आपली मांडी आणि पाठीवर गोंदवून ठेवली होती. त्यामुळे पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यास मदत मिळाली. पोलीस त्याच्या गर्लफ्रेंडची देखील चौकशी करत होते. या प्रकरणी आतापर्यंत स्पा मालकासह राजस्थानमधील तिघांना अटक करण्यात आली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close