सामाजिक
अहमदनगर पहिली मंडळी येथे ख्रिस्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
नगर – हातमपुरा येथील अहमदनगर पहिली मंडळी (सी.एन.आय.) नाशिक धर्मप्रांत यांच्यावतीने नाताळनिमित्त ख्रिस्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात सारा करण्यात आला. याप्रसंगी रेव्ह. अभिजित तुपसुंदरे यांनी उपस्थित मंडळींना प्रभु येशूच्या संदेश दिला. प्रभू येशूंच्या जगातील आगमनाचा संदेश दिला गेला. प्रभू येशूंचा जन्म या जगात का झाला.. कशासाठी झाला हे सांगून प्रभु येशू यांनी जगातील सर्व मानवजातीचा आपल्या पापातून उद्धार केला व सर्व जगाला प्रीति आणि शांतीचा संदेश दिला.
उपस्थितांना संदेश देतांना रेव्ह. अभिजित तुपसुंदरे म्हणाले, प्रभु येशू लोकांना त्यांच्या पापांबद्दल पश्चात्ताप करण्यासाठी आणि स्वतःला पूर्णपणे देवाला समर्पित करण्यासाठी बोलावतो. तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण मनाने प्रीती करा. ’तुम्ही तुमच्या शेजार्यावर स्वतःसारखे प्रेम करा. प्रभु येशूच्या इतर नैतिक शिकवणींमध्ये तुमच्या शत्रूंवर प्रेम करणे, द्वेष यापासून दूर राहणे, तुमच्याविरुद्ध पाप केलेल्या लोकांना क्षमा करणे. ही शिकवण प्रभु येशू ख्रिस्तांनी दिली आहे. ही शिकवण आपण आचरणात आणल्यास आपल्या जीवनाचा उद्धार होऊ शकतो, असा संदेश दिला.
यावेळी ख्रिस्त गिते गाऊन अहमदनगरमधील सर्वांनी एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पहिली मंडळीतील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाताळ निमित्त सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी चर्चचे धर्मगुरु रेव्ह अभिजीत तूपसूंदरे सचिव सतिश मिसाळ, उपसचिव प्रितम जाधव, खजिनदार डॉ. संजय लाड, उपखजिनदार सॅम्युएल बोर्डे, कार्यक्रम समिती अध्यक्ष प्रसन्ना शिंदे, प्रा. विनीत गायकवाड, श्री रविद्रं लोंढे, सुनित ढगे, अमोल लोंढे, कुमार हर्षल पाटोळे, सौ. शोभना गायकवाड, सौ. वंदना शिंदे, सौ. कांदबरी सुर्यवंशी, सौ. शशिकला साळुंके, श्रीमती स्नेहल साळवे या कमिटी सदस्यांनी परिश्रम घेतले. तसेच कौतुकास्पद परिश्रम चर्चचा तरुण संघाने घेतले. महिला मंडळ, चर्च सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
– हातमपुरा येथील अहमदनगर पहिली मंडळी येथील चर्चमध्ये ख्रिस्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात सारा करण्यात आला. याप्रसंगी रेव्ह. अभिजित तुपसुंदरे यांनी उपस्थित मंडळींना प्रभु येशूच्या संदेश दिला. (छाया : यतीन कांबळे)