अजब गजब

चीनने बनवली वाऱ्याच्या वेगाला मात करणारी बुलेट ट्रेन

Spread the love

                   तंत्रज्ञानाच्या बाबतीत काही न काही वेगळे करून दाखवण्यात चीन नेहमीच अग्रस्थानी राहत आला आहे. त्याने केलेल्या नवनवीन प्रयोगाद्वारे जगाला तोंडात बोट घालण्यास जाग पाडले आहे.आता तर चीनने CR 450 नावाच्या नवीन हायस्पीड ट्रेन ची निर्मिती करून जगाला आणखी एक धक्का दिला आहे.  केवळ वेगातच नव्हे, तर तंत्रज्ञान, आराम आणि पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीनेही इतिहास रचला आहे.

ही ट्रेन रुळांवरून धावत नाही, ती अक्षरशः हवेत उडते, आणि हे शब्दशः नाही, तर तिच्या अतिशय अद्वितीय वेगामुळे ही अनुभूती होते. जिथे भारतातील वंदे भारतसारख्या प्रगत ट्रेनचा वेग 180 किमी/ताशी आहे, तिथे CR450 ने चक्क 453 किमी/ताशी वेगाने धावून साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

CR450 ट्रेनची वैशिष्ट्ये

CR450 ही ‘चायना रेल्वे’ने विकसित केलेली एक अल्ट्रा-हाय-स्पीड बुलेट ट्रेन आहे. तिला फक्त वेगासाठी नाही, तर भविष्याचा विचार करून, प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आलं आहे.ही ट्रेन फक्त जलदच नाही, तर अत्यंत शांत आहे. तिच्या आत बसल्यावर गतीचा आवाजही जाणवत नाही. विशेष ध्वनी-नियंत्रण तंत्रज्ञानामुळे गोंगाट नगण्य असतो, आणि त्यामुळे लांबच्या प्रवासादरम्यानही तुमचा अनुभव एकदम आरामदायी आणि शांतीदायक असतो. प्रवास करताना थकवा जाणवत नाही, उलट तुम्ही मनापासून प्रवासाचा आनंद घेता.

L
याचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे, ही पूर्णपणे इलेक्ट्रिक ट्रेन असून ती हरित ऊर्जेवर चालते. ती केवळ वेगानेच धावते असं नाही, तर प्रदूषणाच्या समस्यांपासूनही मुक्त करते. पर्यावरणावर कसलाही दुष्परिणाम न करता, ही ट्रेन एक नवा ‘ग्रीन मोबिलिटी’चा आदर्श ठरते.

CR450 ट्रेनमधील सुविधा

CR450 ही ट्रेन म्हणजे चीनच्या आधुनिकतेचं एक बोलकं उदाहरण आहे. ती स्मार्ट आहे, तंत्रज्ञानात समृद्ध आहे आणि प्रवाशांना एक प्रीमियम अनुभव देते. ट्रेनमध्ये एलईडी डिस्प्ले, वाय-फाय, मोबाइल चार्जिंग पोर्ट्स, स्मार्ट लाइटिंग यांसारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत. सीट्स इतक्या आरामदायी आहेत की, प्रवास केल्यावर वाटतं, आपण कुठल्यातरी हॉटेलात वेळ घालवतोय, ट्रेनमध्ये नाही.

या ट्रेनचं खरं सामर्थ्य म्हणजे तिचा वेळ वाचवणारा वेग. चीनसारख्या मोठ्या देशात, एक शहर दुसऱ्यापासून 500-600 किमी अंतरावर असतं, पण CR450 त्या अंतरावर फक्त एका तासात पोहोचू शकते. यामुळे केवळ प्रवाशांचाच वेळ वाचत नाही, तर देशाच्या व्यावसायिक, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींनाही वेग मिळतो.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close