विदेश

कार अपघातात चिमुकली आणि मुलगी ठार ; पण चिमुकली बाबत वेगळीच माहिती 

Spread the love

लंडन  / नवप्रहार डेस्क                  

              कार आणि डंपर च्या मधात झालेल्या अपघातात वडील आणि 2 वर्षीय चिमुकलीचा करुण अंत झाला आहे. पण चिमुकलीच्या मृत्यू बाबत धक्कादायक बातमी समजली आहे. ती ऐकून पोलीस देखील चक्रावले आहेत.

ब्रिटनमधील ही धक्कादायक घटना. रस्किंगटन आणि एनविक, लिंकनशायर यादरम्यान A153 वर हा अपघात झाला. या अपघात बापलेकीचा मृत्यू झाला. अॅशले हेन्नी असं वडिलांचं नाव तर ओरिया असं मुलीचं नाव. अॅशलेनं त्याची निसान कश्काई ही गाडी समोरून येणाऱ्या लॉरीच्या मार्गावर नेली. या घटनेत मुलगी आणि वडील दोघंही मृतावस्थेत आढळले. पण या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना भयानक सत्य समजलं.

वेगळे राहतात ओरियाचे आईवडील

चौकशीत असं समोर आलं आहे की ओरियाचे वडील अॅशले आपल्या जोडीदारापासून म्हणजे ओरियाची आई रेचेल लीडरपासून वेगळे झाले होते. अॅशले ओरियाला वीकेंडला भेटायचा. मिररच्या अहवालानुसार, जून 2023 मध्ये असाच वीकेंडला तो आपल्या मुलीला भेटायला गेला होता. लिंकनशायर ॲशले इथं त्यानं आपल्या मुलीसोबत वेळ घालवला त्यानंतर तिला पुन्हा लीसेस्टरशायरला घेऊन जात होता. तेव्हा हा अफगात झाला.

जाणूनबुजून अपघात

अॅश्ले डिप्रेशनमध्ये होता. नातं तुटल्याच्या दुःखाचा सामना तो करू शकला नाही. अपघातापूर्वी त्यानं गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला नसल्याचं स्पष्ट झालं. तसंच ॲशलीच्या कॉम्प्युटरवर एक चिठ्ठी सापडली. ज्यात त्याने गेल्या जूनमध्ये फादर्स डेच्या दिवशी स्वतःचे आणि मुलीचं आयुष्य संपवणार असल्याचं नमूद केलं होतं.

अपघाताआधी मुलीची हत्या

पोलीस तपासात असे आढळून आलं की, प्रत्यक्षात ही हत्या आणि आत्महत्येचे प्रकरण आहे, ज्यामध्ये कार अपघात होण्यापूर्वी वडिलांनी मुलीची जाणीवपूर्वक हत्या केली होती. कारण अपघात होण्याआधीच मुलीचा मृत्यू झाला होता हे तपासात समोर आलं आहे.

पॅथॉलॉजिस्टने या संशयाला समर्थन देणारे अनेक पुरावे मिळाले आहेत. पण मुलीच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलं नाही. मुलीचा मृत्यू रस्ते अपघातापूर्वी काही बेकायदेशीर कृत्यामुळे झाला असावा, असं कोरोनरच्या वृत्तात म्हटलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close