३५० रू उधार ; चाकुचे ६० वार
उधारीच्या रकमेवरून तरुणावर चाकुचे ६० वार करून
खून करून खुनी त्याच्या मृतदेहावर नाचला
नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया
त्याला बिर्याणी खायची असल्याने त्याने त्याच्याकडे (तरुणाकडे) ३५० रू. मागितले. त्याने देण्यास नकार दर्शवला. त्यामुळे तो इतका संतापला की त्याने त्याच्यावर चाकूने ६० वार करून त्याचा खून केला. त्यानंतर त्याने त्याची मान कापण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरही समाधान न झाल्याने त्याने मृतदेहाच्या डोक्याला लात मारली आणि तो मृतदेहावर अक्षरशः नाचला. अंगावर काटा उभा करणारी ही घटना आहे दिल्लीच्या वेलकम ठाण्याच्या हद्दीतील.
. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना दिल्लीतील वेलकम पोलिस स्टेशन परिसरात मंगळवारी रात्री ही घटना घडली.
पोलिसांनी बुधवारी सकाळी १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने शाळा सोडली असून तो त्याच्या आई वडीलांसोबत राहतो. त्याचे आई-वडील रोजंदारी मजूर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हत्येवेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. तर खून झालेला मुलगा हा जाफ्राबादजवळ त्याच्या आईसोबत राहत होता.
बिर्याणी खायला पैसे न दिल्याने केली हत्या
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार आरोपी आणि खून झालेला तरुण हे दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते. आरोपी खून झालेल्या तरुणाकडे गेला. त्याने बिर्याणी घेण्यासाठी ३५० रुपये मागितले. मात्र, खून झालेल्या तरुणाने ते देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपीने त्याच्या जवळील पैसे हिसकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. यानंतर आरोपीने तरुणाचा गळा आवळून त्याला बेशुद्ध केले.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रात्री १०.२० च्या सुमारास आरोपीने बेशुद्ध असलेल्या तरुणाला एका अरुंद गल्लीत ओढत नेले. या ठिकाणी त्याच्यावर तब्बल ६० वेळा चाकूने वार केले. आरोपीने तरुणाच्या मानेवर, कानावर आणि चेहऱ्यावर वार केले. काही वेळ थांबल्यावर त्याने पुन्हा मृतदेहावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
हत्येनंतर मृतदेहावर नाचला
मृतदेहावर चाकूने वार केल्यावर आरोपी काही वेळ थांबला. यानंतर त्याने मृतदेहाला लाथ मारली. रक्ताने माखलेल्या मृतदेहावर बसून त्याने मानेचा चावा घेतला. यानंतर त्याच्या मृतदेहावर आरोपी नाचला. यानंतर आरोपी हा फरार झाला.