सामाजिक

परभणीतील संविधानाचा अवमान आणि बीडमधील अपहरणाच्या निषेधार्थ आदिवासी महिलांचा सामूहिक निषेध

Spread the love

 

यवतमाळ: / प्रतिनिधी
परभणी येथील संविधानाचा अवमान, सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू आणि बीडमधील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण या तिन्ही घटनांच्या निषेधार्थ आज दिनांक 17 डिसेंबर रोजी सकाळी ठीक 12 वा.यवतमाळ शहरातील आदिवासी सोसायटीच्या महिलांनी एकत्र येत सामूहिक निषेध नोंदवला.या वेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक मेश्राम आणि विद्या परचाके यांच्या वतीने डॉ.भारत नांदुरे लिखित संविधानाच्या प्रती महिलांना वाटप करण्यात आल्या. उपस्थित महिलांनी संविधानाचे वाचन केले आणि संविधानाच्या महत्त्वाबद्दल प्रा. पंढरी पाठे यांनी जनजागृतीचा संदेश दिला.यावेळी लीना बोरकर,विद्या परचाके,वैष्णवी गेडाम,सविता चौधरी, निशा वाघाडे,कल्पना पोयाम,मीना केळकर,लीना नैताम,सुलोचना कुळसंगे, लता केळकर,जया मडावी,वैशाली खोब्रागडे,सविता तोडसाम,सुनंदा खंडाते, रेखा सलाम,संगीता मडावी यांसह अनेक महिलांनी सहभाग घेतला.या सामूहिक निषेधाने संविधानाच्या शपथ आणि मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्याच्या महत्त्वाकांक्षेची जाणीव दिली.

🚩माउली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close