शाशकीय

छत्रपती शिवाजी चौकात दंगा काबू रंगीत तालीम

Spread the love

 

राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी ।

पुसद -आगामी दहीहंडी,श्रीगणेश उत्सव, ईद-ए-मिलाद,पोळा उत्सव संबंधाने सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतूलकर यांच्या आदेशान्वये दि.३० ऑगस्ट २०२३ रोजी वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रपती शिवाजी चौकात दंगा काबू रंगीत तालीम करण्यात आली.

दंगा काबू रंगीत तालीमेकरिता सहा पोलीस अधिकारी व ४१ पोलीस कर्मचारी हजर होते.रंगीत तालीमेसाठी वसंत नगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रविण नाचनकर यांच्या उपस्थीतीत घेण्यात आली.त्या वेळेत हाताळण्याकरीता पोलीस स्टेशन परिसरातील फिक्स पॉईंट, मोहम्मदिया मस्जिद, दुर्गा माता चौक,रहमानीया मस्जिद, आयाशा चौक,जी.एन.कॉलेज, मामा चौक,अक्सा चौक आदी ठिकाणी फिक्स पॉईंट ड्युटी नेमण्यात आले.सदर दंगा काबू व फिक्स पॉईंट वरील अधिकारी व पोलिसांना अंमलदारांना दंगा काबू योजनेचे प्रयोजन सांगून वेळीच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कसा हाताळावे व विविध आगामी सण उत्सव संबंधाने महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close