१९ पासून चांदूररेल्वेत शिवजयंती महोत्सव
प्रसिद्ध शिव व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे शिव व्याख्यान
चांदूर रेल्वे तालुका प्रतिनिधी
चांदूर रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १९ फेब्रुवारीरोजी जयंतीनिमित्त चांदूररेल्वे तालुक्यातील शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार मंचतर्फे भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विविध स्पर्धेसह २४ फेब्रुवारीला प्रसिद्ध शिव व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे शिव व्याख्यान होणार आहे.
शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार मंचतर्फे शिवजयंती उत्सवाचे हे दुसरे वर्ष असून १९ ते २४ फेब्रुवारीपर्यंत भरगच्च कार्यक्रम या महोत्सवात होणार आहे. त्यात १९ फेब्रुवारी सकाळी ८ वाजता भव्य मिरवणूक व मोटार बाईक रॅलीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करून करण्यात येणार आहे.
२० फेब्रुवारीला तालुक्यातील वर्ग ६ ते ९ च्या विद्यार्थ्यांसाठी शिवछत्रपती सामान्य ज्ञान स्पर्धा, २१ फेब्रुवारीला शिवछत्रपती रिल्स स्पर्धा आहे. त्याचा विषय ‘माँ साहेब जिजाऊ आणि बाल शिवाजी’ असा असल्याचे
शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार मंचचे आयोजन
समजते, तर २२ फेब्रुवारीला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘शिवरायांचे प्रजासत्ताक धोरण’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे.याशिवाय २३ फेब्रुवारी रोजी शिवछत्रपती चित्रकला प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्व स्पर्धा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी असून रोख बक्षिसांसोबत प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
२४ ला प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान
महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे शिवव्याख्यान २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता स्थानिक जि.प. शाळेच्या मैदानावर होणार असून या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित म्हणून माजी आ. प्रा. वीरेंद्र जगताप हे उपस्थित राहणार आहे.