हटके

चालत्या दुचाकीवर नवरा- बायकोचे ते कृत्य पाहून भडकले नेटकरी

Spread the love

                 दुचाकीवर प्रेमवीरांचे एकमेकांच्या मिठीत बसने  किंवा चालत्या गाडीवर ऐकमेकांना किस करणे या प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची दखल घेत पोलीस प्रशासनाने काही वेळा अश्या विकृत प्रेमी युगलांना समज देत सोडून दिले आहे तर काही वेळा कारवाई देखील केली आहे.पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओ ने नेटकाऱ्यांचा चांगलाच पारा चढला असून अनेकांनी या जोडप्याला खडे बोल सुनावले आहेत.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर होताच तुफान व्हायरल झाला आहे. बाईकवरून प्रवास करणाऱ्या कुटुंबाच्या शेजारी असलेल्या कारमधून कोणीतरी व्हिडिओ शूट करत आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहताना एक एक करून या जोडप्याच्या बेजबाबदारीचा व नियम भंग करणाऱ्या कृतीची यादी बनवू शकता. पत्नी, पती आणि त्यांच्या मुलाने हेल्मेट घातलेले नाही ही त्यांची पहिली चूक. तर दुसरं म्हणजे चक्क सार्वजनिक ठिकाणी प्रवासात ही व्यक्ती सिगरेट ओढताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याच्या मागे बसलेली त्याची बायकोच आपल्या पतीला यासाठी मदत करत आहे.

तुम्ही बघू शकता की मुलगाबाईकच्या टाकीवर बसला आहे तर बायको साडी नेसून नवऱ्याच्या मागे बसली आहे. नवरा एका बाजूला वळतो आणि त्याची बायको त्याला सिगारेट देते. बाळाचे लक्ष नसले तरी पॅसिव्ह स्मोकिंगमुळे त्याच्यापर्यंत सुद्धा हा विषारी धूर पोहोचत असणारच. या व्हिडिओला आतापर्यंत १ लाख ७२ हजार ८०७ व्ह्यूज मिळाले आहेत.

आम्ही आमच्या वाचकांना असा सल्ला देऊ शकतो की असे स्टंट रस्त्यावर कधीही प्रदर्शित करू नका. निष्काळजीपणामुळे आपण स्वतःसह इतरांचे सुद्धा आयुष्य धोक्यात आणू शकता. दरम्यान हा व्हिडीओ काहींनी मजेशीर पद्धतीने पाहत बाईकवर नव्हे पण सिगारेट ओढायला मदत करणारी बायको मिळावी अशीही इच्छा व्यक्त केली आहे. तर बहुतांश नेटकऱ्यांनी या जोडप्याला ऑनलाईन प्रचंड सुनावले आहे

What’s your Reaction?
+1
1
+1
1
+1
0
+1
4
+1
1
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close