हटके

चालत्या बस ची मागची काच फुटली आणि …..

Spread the love

जामनगर / गुजरात – नवप्रहार न्यूज नेटवर्क 

देशात अनेक अश्या घटना घडत असतात ज्या घडल्यावर त्यावर बरीच चर्चा होते. त्यावर उपाययोजना देखील सुचविल्या जातात.पण घटना ही घडून गेलेली असते. आणि त्यात नुकसान होणाऱ्याचे नुकसान देखील होऊन जाते. गुजरातच्या जामनगर मध्ये देखील अशीच घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेबद्दल ऐकून आपण देखील थक्क व्हायला

. व्हिडीओमध्ये एक शहरातील बस स्पीडब्रेकरवरती जोरात आदळते.

एक बस रस्त्याने जात असताना ती गतिरोधकावरून उसळते. त्यात तिची मागची काच फुटते. त्यातून दोन मुलं बाहेर पडतात. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. त्यावेळी पाठीमागे गाडी नसल्यामुळे दोन मुलं त्या अपघातातून बजावली आहेत.

काच फुटल्याने तरुण पडले

सद्या व्हायरल झालेलं सीसीटिव्ही फुटेज एएनआईने ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले आहे. त्यामध्ये हा व्हिडीओ गुजरात राज्यातील जामनगर परिसरातील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर बसमधून पडलेले दोन विद्यार्थी आहेत. गुलाबनगर परिसरातून ज्यावेळी बस जोरात स्पीडब्रेकरवरुन गेली त्यावेळी हा सगळा प्रकार घडला आहे. काच फुटलेली आणि विद्यार्थी खाली पडलेली माहिती चालकाना नव्हती, तो तसाच पुढे बस चालवत राहिला.

बस चालक निलंबित

गाडीची काच ज्यावेळी फुटून खाली पडते. त्याचवेळी दोन शाळेचे विद्यार्थी खाली पडतात. सध्या त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर बस डेपोच्या व्यवस्थापकाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी कारवाई करत बस चालकाला निलंबित केले. त्याचवेळी बसच्या काचा फुटल्याने दोन्ही तरुण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close