चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनला 350 वा शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट
तालुका प्रतिनिधी- प्रकाश रंगारी
चांदुर रेल्वे येथून जवळच असलेल्या बासलापूर मधील ग्रामस्थांच्या वतीने तिथीनुसार होत असलेल्या शिवजयंती व साडेतीनशे वर्ष शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनला आज देण्यात आले.
आज चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनची पाहणी करण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस अधीक्षक
अमरावती विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आशित कांबळे, पोलीस निरीक्षक अहिरवार यांना शिवराज्याभिषेक सोहळा आणि शिवजयंती निमित्त चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र वरील मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचे विधिवत पूजन करून हार अर्पण करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य अमोलभाऊ होले शिवसेना उपतालुका प्रमुख गजानन बोबडे, ग्रामपंचायत खडसे, प्रतिकेश बोबडे, गणेश बोबडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.