चक्क दगडांची वाहू लागली नदी
उत्तराखंड / नवप्रहार डेस्क
आपण नदी, नाले प्रवाहित होताना पाहिले असतील. पण कधी आपण दगडांची नदी वाहताना पहिली आहे काय ? असे जर कोणी आपणाला विचारले तर तुमचे उत्तर हे असेल की काही तरीच काय ! कधी दगडं सुद्धा वाहतात काय ? पण आम्ही आता आपणाला जे दाखवणार आहोत ते पाहुन तुम्ही सुद्धा अवाक राहाल.
गेल्या आठवड्यात उत्तराखंडमधील चमोली येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद झाला. दरम्यान या थरारक घडनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान आता नवा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये भुस्खलन झाल्यानंतर पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे दगड वाहताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. दरम्यान एक व्यक्ती शांतपणे दृश्य पाहताना दिसत आहे.
ही घटना लाहौल-स्पिती जिल्ह्यातील उदयपूरच्या पागल नाल्यात घडली आणि १२ जुलै रोजी व्हिडिओ व्हायरल झाला. निसर्गाच्या चमत्कारांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या हे दृश्य उत्तर भारतातील हिमाचल प्रदेशमधील आहे. डोंगराळ प्रदेशात, भूस्खलनादरम्यान, खडक पाण्यासारखे वाहतात, गुरुत्वाकर्षण आणि भूगर्भीय नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती शांतपणे आश्चर्यकारक दृश्य पाहत आहे. हा व्यक्ती निर्भयपणे खडक पाण्यासारखे वाहताना पाहत आहे.
व्हायरल व्हिडीओ एक्सवर @ChaudharyParvez नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहे.
इंस्टाग्रामवर fyzann90’sf नावाच्या खात्यावरून अशाच प्रकारचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आहे. या व्हिडीओमध्ये डोगराळ भागातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहबरोबर अचानक मोठ मोठे दगड देखील वाहत येताना दिसत आहे. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
दरम्यान पावसाळ्यात वर्षाविहारासाठी डोंगर-दऱ्या-धबधबे अशा ठिकाणी जाताना सावधगिरी बाळगण्याचे महत्त्व हे व्हिडीओ दर्शवत आहे. याआधी अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने काही लोक वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान घाटमार्गात भुस्खलनाच्या घडना घडत आहे त्यामुळे प्रवाशांना सावगिरी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.