शाशकीय

आरटीओ गोळीबार प्रकरण कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल 

Spread the love

नागपूर / प्रतिनिधी 
 
                   मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्या वर झालेल्या गोळीबार प्रकरणात एलसीबी ने  महिला मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांना कलम 307 अन्वये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी केले आहे. विशेष म्हणजे, घटनेमध्ये गोळी लागून जखमी झालेले संकेत गायकवाड यांना कलम 201 नुसार पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. दोघांनीही अटकपूर्ण जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक संकेत भारत गायकवाड हे कर्तव्यावर जात असताना, 7 मे 2022 ला सकाळी 6.45 वाजताच्या सुमारास होलस्टरमध्ये (रिव्हॉल्व्हर ठेवण्याचे कव्हर) रिव्हॉल्व्हर ठेवताना त्यांच्या पायावरून उंदीर गेला. दचकल्याने गायकवाड यांच्या हातून रिव्हॉल्व्हर खाली पडले व त्यातून गोळी सुटली.

ती उजव्या पायाच्या पोटरीत अडकली. त्यानंतर गीता शेजवळ व विरसेन ढवळे यांनी गायकवाड यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याप्रकरणाची बजाजनगर पोलिसांनी नोंद घेतली. गुन्हे शाखेच्या तपासात पत्नीसह कोमल, वीरसेन ढवळे व गीता शेजवळ यांची साक्ष नोंदविल्यावर त्यात तफावत आढळली. त्यामुळे 12 जानेवारीला बजाजनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गायकवाड यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.

याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी संकेत गायकवाड यांच्यासह, त्यांच्या पत्नी कोमल, वीरसेन ढवळे व गीता शेजवळ यांना पोलिसांनी नोटीस बजावली. त्यापैकी वीरसेन ढवळे यांनी बयाण नोंदविले. मात्र, शेजवळ व गायकवाड यांना दोनदा नोटीस बजावून चौकशीसाठी ते आले नाही. याउलट बुधवारी दोघांनी चौकशी टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close