कृषी सहसंचालक व कृषी अधीक्षकांनी केली नुकसानग्रस्त कापूस,पान पिपरी, तूर, कांदा पिकाची पाहणी

नुकत्याच चार दिवसापूर्वी झालेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे अंजनगाव सुर्जी ह्या भागातील पान पिपरी, कापूस, तूर, कांदा ह्या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ह्यामध्ये ह्या भागातील शेतकऱ्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे ह्याबाबत नुकतीच खासदार अनिलजी बोन्डे ह्यांनी सुद्धा ह्या भागातील नुकसान ग्रस्त पिकांची पाहणी केली असता झालेल्या विदारक परिस्थिती बाबत संभंधित सर्व विभागाना सूचित केले होते त्या अनुषंगाने नुकतीच जिल्हा कृषी सहसंचालक मुळे, जिल्हा कृषी अधीक्षक सातपुते, यांनी प्रत्यक्ष अंजनगाव सुर्जी येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी बद्दल पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली ह्याप्रसंगी कमलकांत लाडोळे माजी नगराध्यक्ष, मनोहर भावे मा नगरसेवक,मनोहर मुरकुटे ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष,भाजपा, सुभाष थोरात किसान मोर्चा आघाडी सरचिटणीस, मधुकर गुजर मा नगरसेवक, नंदकिशोर आवंडकर संचालक नागार्जुन औषधी वनस्पती फार्मर प्रोडूसर कंपनी, संजय नाठे मा शहराध्यक्ष, योगेश नेमाडे सरपंच खोडगाव कृषी विभागाचे विरेंद्र वाट, व्ही एन पुंडकर, खर्डे,, राजकुमार गवई,शेतकरी प्रशांत बोडखे ,येऊल,केदार, विनायक येऊल, गोविंद भावे,व इतर पिंपरी उत्पादक शेतकरी उपस्थित होते ह्याप्रसंगी नागार्जुन औषधी वनस्पती फार्मर प्रोडूसर कंपनीचे संचालक व अंजनगाव सुर्जी तहसीलदार सौं सोळंके यांच्याशी पिंपरी नुकसानीबाबत योग्य अशी चर्चा करून पिपरी च्या नुकसानी बद्दल माहिती देऊन नागार्जुन औषधी वनस्पती फार्मर प्रोडूसर कंपनीतर्फे सहसंचालक मुळे, कृषी अधीक्षक सातपुते व यांना निवेदन देण्यात आले