सूर्यकळा कवितासंग्रहाच्या नंतरच्या कवितासंग्रहाचे लोकार्पण सोहळ्याच्या आयोजन
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
स्मृतीशेष डॉ. गणेश टाले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांनी लिहिलेल्या सूर्यकळा हा कवितासंग्रह त्यानंतर अनेक लिखाण केले परंतु त्यांनी लिहिलेल्या सूर्यकळा कवितासंग्रहाच्या नंतरच्या कविता संग्रहाचे लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 19 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.आर वाघमारे (माजी परीक्षा नियंत्रक अमरावती विद्यापीठ )तर आंबेडकरी विचारवंत साहित्यिक प्रभाकर गंभीर यांच्या शुभहस्ते प्रमुख अतिथी प्रा. डॉ. सुखदेव ढाणके, प्रा. डॉ. विनायक त्रिपतीवार, प्रा.डॉ. गजानन बनसोड, प्रा. डॉ. अण्णा वैद्य देविदास टाले यांच्या प्रमुख उपस्थितीत सूर्यकळानंतरच्या कवितेचा कवितासंग्रहाचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
यानंतर धामणगाव रेल्वे नगरी मध्ये गणेश टाले स्मृती कवी संमेलन होणार आहे.
या कवी संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भूषण रामटेके तर प्रमुख अतिथी गझलकार प्रा. डॉ. सिद्धार्थ भगत विशेष अतिथी म्हणून राहणार आहे तर या कवी संमेलनामध्ये पुरुषोत्तम डोंगरे ,प्रकाश बनसोड, इब्राहिम खान, शरद काळे, प्रशांत ढोले दिगंबर झाडे, नंदाताई तायवाडे, विलास जाधव ,अनंत मावळे ,संजय पाटील ,प्रमोद हातेकर ,सुरेश वानखडे, गुलाब मेश्राम, बेबी नाज खान, नारायण सुरंदसे,रमेश बुरबुरे, संजय मोकळे रत्ना मनवरे आदींचा सहभाग या कवी संमेलनात होणार आहे.
या लोकार्पण सोहळ्याचा व कवी संमेलनाच्या लाभ घेण्याचे आव्हान इंदिरा टाले,नितीन टाले, विप्लव टाले,गोपाल तायडे, देवराव शेडे, उत्कर्ष टाले, सिद्धार्थ टाले उपस्थित राहण्याचे आवाहन आदींनी केले आहे.