शाशकीय

शिक्षकांचे वेतन अन्यचं कामात खर्च केले

Spread the love

न.प. घाटंजी मनमानी कारभारावर वरिष्ठांकडून चौकशी करण्याची मागणी

न.प. पालीका महानगर पालिका घाटंजी शिक्षक संघाची मागणी.

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार

शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देत समाजात अन्यायाला वाच्या फोडण्याची विद्याद्यार्थाना शिकवणून देतो पण, सध्या घाटंजीत न.प.शिक्षकांवरचं अन्याय होत असून त्या विरुद्ध आता शिक्षकांनाच वरिष्ठांकडे तक्रार करण्याची वेळ आली आहे. घाटंजी न.प.पालिका व महानगरपालिका शिक्षक संघानी शिक्षकांचे विविध समस्या बाबत वरिष्ठांकडे तक्रार करत माहे सप्टेंबर चे वेतन न झाल्या बाबत,७ व्या वेतन आयोगाच्या २ हप्ता भविष्य निर्वाह निधी जमा न झाल्या बाबत , शिक्षकांचे १२ वर्षा पासून भविष्य निर्वाह निधीचा हिशोब व व्याज आकारणी न केल्या बदल,तसेच शिक्षकांचे पगारातुन कपात होत असलेल्या विमा परस्पर बंद करण्यात आला याबदल विविध समस्यांचा पाढाच लिखीत स्वरुपात वरिष्ठाकडे पाठविला आहे. या तक्रारीत अन्याय ग्रस्त शिक्षकांनी नमूद करण्यात केले की,न.प. प्रशासक अधिकारी घाटंजी व संमंधीत विभाग अधिकारी हे न.प. शिक्षकांचे आलेले ऑनलाईन वेतन हे इतरच कामासाठी खर्च केले असून शिक्षकांना वेतनापासून वंचित ठेवले आहे.त्यामुळे शिक्षक बांधवांना कर्जाचे हप्ते व ईतर सनाच्या निमित्ताने नाहक आर्थिक त्रासास समोर जावे लागत आहे. याबाबत न.प.अधिकारी यांना वेतन १३/१०/२३ ला शिक्षण विभागाच्या खात्यात जमा झाले बदल विचारना केली असून अद्याप पर्यंत कुठलीही ठोस पावले उचलली गेली नाही. शिवाय ७ वेतन आयोगाचा निधी जमा केल्या गेला हे न.प. कडून सांगण्यात येते. पण,दूसरा हप्ता आला तरी निधी खात्यात जमा झाला नाही. भविष्य आकारणी निधी जमा आकारणी व व्याज गेल्या १२ वर्षा पासून हिशोब झाला नाही या काळात बरेचसे शिक्षक निवृत्त झाले त्यांना केवळ मुद्दल मिळाली पण व्याजाचा अद्याप पत्ता नाही. एवढेच नाही तर न.प.शिक्षक विभागाने गेल्या ३० ते ३५ वर्षा पासून कार्यालयात सुरू असलेल्या विमा कपातही परस्पर बंद केल्या याबाबत कुठलीही पुर्वसूचना देण्यात आली नाही.त्यामुळे एखाद्या वेळेस अघटीत अनूचित घटना घडली तर,संबंधित शिक्षकांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व समसेस न.प. मुख्याधिकारी जवाबदारी राहील अशा आशयाचे लिखीत निवेदन घाटंजी न.प. पालिका महानगर पालिकेच्या शिक्षक संघाचे वतीने मा. शिक्षक उपसंचालक अमरावती विभाग यांना पाठविण्यात आले आहे.सदर निवेदन देतेवेळी शिक्षक संघाचे अध्यक्ष अरुण पडलवार, सिंधूताई सिडाम,आशिष साखरकर,अनिकेत निंबाळकर,यास्मिन बेगम व इतरही शिक्षक उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close