राजकिय
प्रकाशजी महाजन यांची कॅप्टन सुनील डोबाळे यांच्या प्रचारार्थ आज आकोट येथे भव्य सभा
अकोट प्रतिनीधी
अकोट – अकोट मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना सर्वोत्तम बाजी मारत तालुक्यांतील पहिल्या भव्य सभेचे आयोजन करुन कॅप्टन सुनील डोबाळे यांनी रणसिंग फुंकले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अकोट मतदार संघाचे अधिकृत उमेदवार कॅप्टन सुनील डोबाळे यांच्या प्रचारासाठी मनसेचे सरचिटणीस प्रकाशजी महाजन यांच्या जाहीर सभेचे आयोजन अकोट येथे करण्यात आले आहे.
दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता नरसिंग महाराज पटांगण आकोट येथे जाहीर सभा होणार आहे.
त्यानिमित्त तमाम मनसे सैनिकांनी तसेच मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी या सभेला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन अकोट,अकोला मनसे तर्फे केले आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1