क्राइम

बिल्डर ला धमकावून खंडणी मागणाऱ्या दोन पत्रकारांवर गुन्हा दाखल

Spread the love

पुणे / नवप्रहार मीडिया

                 बिल्डर ला धमकावून खंडणी मागणाऱ्या दोन पत्रकारांवर कोर्टाच्या आदेशावरून खंडणी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय पोवार  (वय-40 रा. कर्मभुमीनगर, लोहगाव, पुणे – , शब्बीर शेख  (रा. आळंदी-धानोरी रोड, बुद्ध विहार जवळ, विश्रांतवाडी अशी त्यांची नावे असून – यांच्यावर आयपीसी 383, 499, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत विलास गुलाबराव देशमुख (वय-64 रा. वडगावशेरी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उदय पोवार हा पुण्यातील एका दैनिकात पत्रकार म्हणून काम करतो. तर शब्बीर शेख हा देखील पत्रकार आहे. आरोपींनी वडगावशेरी येथील पंपींग स्टेशन येथे फिर्यादी यांच्याकडे खंडणीची मागणी केली. त्यांनी फिर्यादी यांच्याकडून आतापर्य़ंत 25 हजार रुपये रोख आणि 5 हजार रुपये युपीआय द्वारे असे एकूण 30 हजार रुपये घेतले आहेत.आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे पुन्हा खंडणीची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर शब्बीर शेख याने फिर्यादी यांचा चालक राजाराम मधोळकर यांच्या फोनवर फोन करुन फिर्यादी यांना व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देली.

आरोपींनी खोटी बातमी दाखवली. तसेच वृत्तपत्रामध्ये 14 जुलै रोजी वृत्त देऊन फिर्यादी यांची खोटी बदनामी केली.याबाबत फिर्यादी यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टात धाव घेतली.
कोर्टाच्या आदेशानुसार सीआरपीसी कलम 156(3) नुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड  करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close