सामाजिक

तरुणांनी व्यसनापासून दूर राहून समाज व कुटुंबाला वेळ द्यावा , पुरोहित राजू काका देशपांडे .

Spread the love

 

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – आजकाल च्या तरुणांनी कौटुंबिक स्वास्थ टिकवून ठेवण्यासाठी व्यसनां पासून दूर राहून , आपला बहुमुल्य वेळ समाज व कुटुंबाला द्यावा , असे आवाहन पुरोहित राजू काका देशपांडे यांनी केले आहे .
पुरोहित राजू काका देशपांडे पुढे म्हणाले की , व्यसनांमुळे तरुणांचे शारीरिक नुकसान तर होतेच , त्याचबरोबर आर्थिक , मानसिक , कौटुंबिक , सामाजिक हानी व नुकसान होते , त्यामुळे विवाह इच्छुक तरुणां चे विवाह जुळण्यास फार मोठा अडथळा येतो , सध्याची परिस्थिती पाहता विवाहासाठी तरुणींची संख्या कमी झाली आहे , त्यात तरुणींच्या इच्छा , आकांक्षा ही वाढलेल्या आहेत . अश्या अवस्थेत व्यसनाधिन तरुणांशी विवाह करायला कोणतीही तरुणी तयार होत नाही , परिणामी समाजात विधूर तरुणांची संख्या भरमसाठ पणे वाढत आहे . याला जबाबदार आज काल चे तरुण आहेत . त्यांनी मनाला आवर घालण्यासाठी धार्मिकतेकडे ओळावे , आई , वडीलांची मनोभावे सेवा करावी , याने नुकसान तर काहीच होत नाही , उलट मानसिक स्वास्था बरोबरच आनंदही मिळतो . शिवाय समाजात मान , सन्मान मिळतो . अशा तरुणाबरोबर विवाह करण्यास कोणतीही तरुणी एका पायावर तयार होते . अश्या निव्यर्सनी तरुणांची संख्या ही समाजात वाढणे गरजेचे आहे , तरुणांच्या हातात गरजेपेक्षा जास्त पैसा , आई वडीलांकडून मुलांचे अति लाड, मोबाईल व टि . व्ही चा दुष्परिणाम यामुळे तरुण व्यसनाधितेकडे वळले आहेत . हे थांबविणे काळाची गरज बनली आहे . तरुणांनी आई , वडीलांच्या संपत्ती वर मजा मारून ऐतखावू म्हणून जगण्या पेक्षा स्वकमाई वर जगावे , याने कुटुंबाबरोबर च स्वतः लाही आत्मिक समाधान मिळते . विवाह जमविण्यासाठी अनेकांच्या जन्म पत्रिका माझ्याकडे येतात , सर्व गुण जुळवून ही येतात , अधिक चौकशी करता , संबंध तरुणाची वैयक्तिक माहिती विवाह जुळण्यास मोठा अडथळा ठरतो . त्यामुळे आता तरी तरुणांनी सुधरावे व व्यसन करताना गेलेला फुकटचा वेळ , कुटुंब व समाजासाठी सत्कारणी लावावा , असे कळकळीचे आवाहन ही पुरोहित राजू काका देशपांडे यांनी केले आहे .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close