अपघात

बस नदीत कोसळून 17 लोकांचा मृत्यू तर 28 प्रवासी जखमी

Spread the love
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, अनेक प्रवासी बेपत्ता
 
नेपाळ /नवप्रहार ब्युरो
 
              बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात 17 लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 28 प्रवासी गंभीर जखमी आहेत. बस नदीत कशी कोसळली याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. 

अपघाताची माहिती मिळताच तातडीनं बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात नेमका कसा झाला? बस नदीत कशी कोसळली? याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, मात्र भरधाव वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये एका न्यूझीलंडच्या तर एका ब्रिटिश नागरिकाचा समावेश आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हा अपघात नेपाळमधील धाडिंग जिल्ह्यातल्या गजुरी परिसरात झाला आहे. रविवारी रात्री उशिरा एक प्रवासी बस त्रिशूली नदीमध्ये कोसळली, या घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या अपघाताबद्दल माहिती देताना नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलाचे प्रवक्ता बिष्णू प्रसाद भट्ट यांनी सांगितलं की, ही बस पोखरावरून काठमांडूला जात होती. रात्री अंदाजे दीड वाजेच्या सुमारास काठमांडूपासून 90 किलोमीटर अंतरावर पृथ्वी राष्ट्रीय महामार्गावर ही बस त्रिशूली नदीमध्ये कोसळली. घटनास्थळावर आम्हाला आतापर्यंत 17 मृतदेह सापडले आहेत. तर या घटनेत 28 जण गंभीर जखमी आहेत, त्यांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये एक ब्रिटिश तर एका न्यूझीलंडच्या नागरिकाचा देखील समावेश आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे, बसमध्ये असलेल्या प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. बसचा अपघात नेमका अपघात कसा झाला याची माहिती समोर आलेली नाही, मात्र भरधाव वेगामुळे वाहनावरून नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे, असं भट्ट यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातामधील 9 जणांची ओळख पटवण्यात यश आलं आहे. जे लोक या अपघातामध्ये जखमी झाले आहेत, त्यामध्ये एका चीनी नागरिकाचा देखील समावेश आहे, जखमी लोकांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, दरम्यान अजूनही काही नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close