क्राइम

हॉस्टेल मध्ये घुसून विद्यार्थिनींची क्रूर हत्या

Spread the love

कोरमंगळा / नवप्रहार डेस्क

पीजी हॉस्टेल मध्ये घुसून एका तरुणाने याठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थिनीधी चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्यात एक तरुण हातात चाकू आणि पिशवी घेऊन हॉस्टेल मध्ये घुसतांना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये आरोपी दरवाजा उघडून खोलीत शिरला. काही सेकंदांनंतर पीडित मुलगी आणि आरोपी पुन्हा फ्रेममध्ये दिसतात. पीडित मुलगी आरोपीच्या तावडीतून सुटण्यासाठी आक्रोश करताना दिसत आहे. वृत्तानुसार, हल्लेखोर हा तरुणीच्या ओळखीचा कोणीतरी असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी कोरमंगळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृती कुमारी असे पीडित तरुणीचे नाव असून ती एका खासगी कंपनीत काम करत होती. कृती कोरमंगला येथील व्हीआर लेआउटमध्ये राहात होती. या जीवघेण्या घटनेची माहिती मिळताच कोरमंगळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. या निर्घृण हत्येला 48 तासांहून अधिक काळ लोटला असला तरी अद्याप आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

तथारी, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांना मुलीच्या ओळखीच्या कोणीतरी तिचा खून केल्याचा संशय आहे. डीसीपी सारा फातिमा यांनी सांगितले की, एका आरोपीने मुलीच्या वसतिगृहात घुसून तिचा गळा चिरला. या घटनेनंतर मुलीचा जागीच मृत्यू झाला. तरुणीच्या हत्येमागील कारणाचा पोलीस तपास करत आहेत. आरोपीची ओळख पटली आहे. आता त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या घटनेचा व्हिडिओ समोर आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री 11.10 च्या दरम्यान घडली. एका अज्ञात व्यक्तीने चाकू घेऊन पीजीमध्ये प्रवेश केला. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी हातात पिशवी घेऊन येताना आणि पीडितेचा दरवाजा ठोठावताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये आरोपी दरवाजा उघडून खोलीत शिरला. काही सेकंदांनंतर पीडित मुलगी आणि आरोपी पुन्हा फ्रेममध्ये दिसतात. पीडित मुलगी आरोपीच्या तावडीतून सुटण्यासाठी आक्रोश करताना दिसत आहे. वृत्तानुसार, हल्लेखोर हा तरुणीच्या ओळखीचा कोणीतरी असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी कोरमंगळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close