क्राइम

उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबा कडून महिला आणि तिच्या दोन मुलींचे लैंगिक शोषण 

Spread the love

मुंबई / विशेष प्रतिनिधी

                    केवळ अशिक्षित व्यक्ती नाही तर शिक्षित लोकं देखील भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकतात. आणि आपले नुकसान करून बसतात. भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकलेल्या महिला आणि तिच्या दोन मुलींचे भोंदू बाबा कडून लैंगिक शोषण केल्याचा प्रकार मुंबई सारख्या शहरात घडल्याने खळबळ माजली आहे.

एका भोंदू बाबाने उपचाराच्या नावाखाली एक महिला आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. अनेक वर्ष हा प्रकार सुरू होता. शेवटी एका एनजीओच्या माध्यमातून या प्रकरणाला वाचा फुटली. ज्यावेळी या प्रकरणातलं सत्य समोर आलं त्यामुळे सर्वच जण हादरून गेले.

मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेला असलेल्या आरे कॉलनीत हा भोंदूबाबा राहातो. राजाराम रामकुमार यादव असं त्याचं नाव असून तो 43 वर्षाचा आहे. त्याच्याकडे एक महिला आपल्या पतीचे सतत डोके दुखते म्हणून गेली होती. त्यावेळी तिच्या पतीला त्याने काही औषधं दिली. त्यामुळे त्याला बरं वाटू लागले. पुढे त्या महिलेला पोटदुखीचा आजार निर्माण झाला. म्हणून पतीच तिला त्याच भोंदूबाबाकडे घेवून गेला. पोटदुखी बरी करायची असल्यास शरीर संबध ठेवाले लागतील असं त्याने तिला सांगितले. त्यातून त्याने त्या महिलेला भूल घातली.

तिनेही त्या भोंदूबाबावर विश्वास ठेवला. त्यानंतर पुढील पाच वर्ष तो भोदू त्या महिलेचे शोषण करत राहीला. त्यानंतर त्याची वाकडी नजर या महिलेच्या दोन मुलींकडे पडली. मोठी मुलगी ही 16 वर्षाची होती. तर लहान मुलगी ही 13 वर्षाची होती. या मुलींनाही या नराधमाने शारीरिक संबध ठेवण्यास प्रवृत्त केलं. तसं केलं नाही तर नवरा मरेल अशी भिती त्या महिलेला दाखवली. त्यातून त्या अल्पवयीन मुलींचे ही त्याने शोषण केले. मोठ्या मुलीने त्याला प्रतिकार केला होता. पण तिचे त्याच्या समोर काहीच चालले नाही.

या सर्व गोष्टी असह्य झाल्याने पिडीत महिलेने एका सामाजिक संस्थेकडे धाव घेतली. झालेल्या घटनेबाबत त्यांना सर्व काही सांगितले. ही सामाजि संस्था त्या महिलेला घेवून आरे कॉलनी पोलिस स्थानकात गेली. तिथे संबधित महिलेने तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी राजाराम रामकुमार यादव या भोंदू बाबाला अटक केली आहे. शिवाय त्याची चौकशी केली जात आहे. त्याने असे आणखी प्रकार केले आहेत का? किती लोकांना फसवलं आहे याची माहिती पोलिस काढत आहेत. मात्र मुंबईत झालेल्या या घटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close