राजकिय

नवीन मतदार नोंदणी अभियान तालुका आणी शहर काँग्रेस कमिटी चा नवीन उपक्रम

Spread the love

# माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या वतीने आयोजन.

चांदुर रेल्वे( ता. प्र.) प्रकाश रंगारी

चांदुर रेल्वे तालुका व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल येथे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यावतीने नविन मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस परीक्षित जगताप, माझी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रभाकर वाघ, बाजार समिती सभापती गणेश आरेकर ,तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अमोल होले, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीनिवास सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी, माजी उपाध्यक्ष देवानंद खुणे, विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष हर्षल वाघ, माजी नगरसेवक प्रफुल कोकाटे,भीमराव महाणर,रुपेश पुडके,सतपाल वरठे,सारंग देशमुख उपस्तित होते.
दोन ते तीन महिन्यानंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित निवडणूक आयोगाने नव मतदारांचा नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रातील चांदुर रेल्वे तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नविन मतदार नोंदणी अभि – यान आयोजित केले होते.
तालुका शहर व काँग्रेस कमिटी तर्फे आज 100 नवे मतदार यांचे सर्वे कागदपत्रे घेऊन नोंदणी फार्म घेण्यात आले.
यावेळी काँग्रेस कार्यकर्ते महेश कलावटे, शहजाद सौदागर, संघपाल हरणे, सागर भोंडे, बंटी माकोडे, राहुल राऊत,दिनेश वाघाडे,सारंग देशमुख, मनोज गोलाईत, सनी सावंत, शरद घासले, करण मेश्राम, सौरभ इटके सह कार्यकर्ते उपस्तित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close