शैक्षणिक

दोन शिक्षिका शाळेतच भिडल्या ; एकमेकींच्या छातीवर बसून केली मारहाण 

Spread the love

पाटणा (बिहार ) / नवप्रहार ब्यूरो

                          देशाचे भविष्य घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची असते. कारण ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवत असतात ते देशाचे भविष्य असतात. कारण त्यातील काही  IAS, IPS , शास्त्रज्ञ , काही इंजिनियर, डॉक्टर , सामाजिक कार्यकर्ता , शिक्षक तर काही नेते बनणार असतात. लहान वयात शिक्षक मुलांना शिकवण देऊन घडवतात. मुलांवर शिक्षकांच्या उपदेशाचा खूप परिणाम पडतो. पण देशाचे भविष्य घडवणारे शिक्षकचं जर आपसात भांडत असतील तर त्याच्या विद्यार्थ्यांवर परिणाम पडणारच . पाटणा येथील एका शाळेत मुख्याध्यापिका आणि सहायक शिक्षिका यांच्यात शाळेतच फ्रिस्टाईल झाली.

वर्गातून बाहेर येत थेट शेतात जाईपर्यंत एकमेकांना मारहाण करताना या दोन्ही शिक्षिका दिसत आहेत.  या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठा व्हायरल झाला आहे.

ही घटना पटना येथील बिहटा प्रखंड येथील एका विद्यालयातील असून तेथील मुख्याध्यापिका आणि सहाय्यक शिक्षिका यांच्यामध्ये वाद होता. त्यांच्यामध्ये एका गोष्टीवरून क्लासरूममध्ये वाद पेटला आणि शाळेतील विद्यार्थ्यांसमोरच त्यांनी एकमेकांना मारायला सुरूवात केली. यामध्ये एका शिक्षिकेची आईसुद्धा दुसऱ्या शिक्षिकेला चप्पलेने मारहाण करताना दिसत आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
3
+1
1
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close